देशातील काही भागात मुसळधार पाऊस पडणार, नागरिकांना दक्षतेचा इशारा
Rainfall (Image used for representational purpose only) (Photo Credits: PTI)

देशात महाराष्ट्रसह (Maharashtra) विविध भागात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. तर पावसामुळे देशभरात 20 पेक्षा अधिक बळी गेल्याची दुर्घटना घडली आहे. तर गुजरात मधील दक्षिण भाग, नवी दिल्ली येथे मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

तर पुढील 24 तासात वळसाड. नवसारी, डांग, सुरत, नर्मदा आणि बडोदे या जिल्हायत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. त्याचसोबत मेघालय, आसाम, छत्तीसगढ, केरळ, कर्नाटक, अंदमान-निकोबार, अरुणाचल प्रदेशासह गोवा राज्यातसुद्धा पाऊस पडणार आहे.त्यामुळे नागरिकांना दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. (महागाई दर कमी होऊनही पुन्हा एकदा मुंबई ठरले देशातील, तर हाँगकाँग जगातील सर्वात महागडे शहर)

मुसळधार पावसाचा तडाखा समुद्रकिनाऱ्यावर बसला आहे. त्यामुळे यंदा समुद्राच्या जास्त उंचीच्या लाटा येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.त्यामुळे पावसाळ्यात कोणताही दुर्घटना होऊ नये म्हणून यापूर्वीच नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला आहे.