सैनिकांच्या सुरक्षेसाठी केंद्रीय गृह मंत्रालयाचा मोठा निर्णय, केंद्रीय सुरक्षा दलाचे जवान हवाईमार्गे काश्मिरमध्ये पोहचणार
Airlines (Representational Image)

पुलवामा (Pulwama) येथे सीआरपीएफच्या (CRPF)  जवानांवर दहशतवादी संघटनांनी भ्याड हल्ला केला. या हल्ल्यामध्ये 40 जवान जागीच ठार झाल्यानंतर आता भारतीय सुरक्षा व्यवस्थेतील जवानांसाठी गृहमंत्रालयाने मोठा निर्णय घेतला आहे. आता काश्मिरमध्ये तैनात करण्यात आलेल्या सगळया केंद्रीय सुरक्षा दलाच्या जवानांना जम्मू- श्रीनगर हा विमानप्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. यापूर्वी ही सुविधा केवळ उच्च पदस्थ अधिकर्‍यांना लागू होती. सरकारच्या या निर्णयामुळे 780,000  जवानांना फायदा होणार आहे. पुलवामा हल्ल्यानंतर जैश-ए-मोहम्मद कडून अजून एका मोठ्या हल्ल्याची शक्यता; गुप्तचर यंत्रणांचा इशारा

गृहमंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार आता बीएसएफ, आसाम रायफल्स, सीआरपीएफ, सीआयएसएफ, एसएसबी, एनएसजी आणि आयटीबीपीच्या जवानांना काश्मीर खोऱ्यात जाण्यासाठी हवाईमार्गाने जाण्याची मुभा देण्यात आली आहे. सुट्टी घेऊन येताना, जाताना आता सुरक्षा दलाचे अधिकारी आरा विमानाने प्रवास करणार आहेत. दिल्ली-श्रीनगर, श्रीनगर-दिल्ली आणि जम्मू-श्रीनगर व श्रीनगर-दिल्ली या मार्गावर विमान सेवेचा वापर केला जाईल. Pulwama Terror Attack: पुलवामा दहशतवादी हल्ल्यातील शहीद जवानांच्या कुटुंबियांना CREDAI राहत्या शहरात देणार 2BHK फ्लॅट्स

14 फेब्रुवारीच्या दुपारी सीआरपीएफच्या ताफ्यातील एका बसबर स्फोटकांचा ट्रक घुसवून हल्ला करण्यात आला. सारे सीआरपीएफ जवान हे सुट्टी संपवून ड्युटीवर पुन्हा रूजू होत होते. त्यावेळेस हा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यामध्ये 40 जवान ठार झाले. त्यानंतर पिंगलान येथे भारतीय जवानांकडून करण्यात आलेल्या सर्च ऑपरेशनमध्ये 3 दहशतवादी आणि 5 भारतीय जवान ठार झाले.