पुलवामा हल्ल्यानंतर जैश-ए-मोहम्मद कडून अजून एका मोठ्या हल्ल्याची शक्यता; गुप्तचर यंत्रणांचा इशारा
Pulwama Terror Attack | (Photo Credits: IANS)

Pulwama Terror Attack: पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर जैश-ए-मोहम्मद अजून एका मोठ्या हल्ल्याच्या तयारीत असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली आहे. जैश-ए-मोहम्मदच्या प्रमुखांची आणि काश्मीरमधील दहशतवाद्यांशी झालेल्या संभाषणातून गुप्तचर यंत्रणांनी हा महत्त्वपूर्ण इशारा दिला आहे.

गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय सैन्याला अधिक नुकसान पोहचावे म्हणून हा कट रचला जात असून हा हल्ला जम्मू काश्मीर किंवा त्या बाहेरही केला जावू शकतो असा अंदाज वर्तवला जात आहे. 'स्टॅच्यू ऑफ युनिटी,' गुजरातमधील तीर्थक्षेत्रं, रेल्वे स्टेशन्स दहशतवाद्यांच्या हिट लिस्टवर; संशयित ईमेलमुळे खळबळ

पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या प्लॅनचा व्हिडिओ जैश-ए-मोहम्मद कडून जारी करण्यात येणार आहे. यात 20 वर्षीय अली अहमद दार याने स्फोटकांनी भरलेली आपली व्हॅन सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यात कशी नेली, हे दाखवण्यात येणार आहे. हा व्हिडिओ जारी करुन काश्मीरमधील तरुणांना दहशतवादी संघटनेत सहभागी करुन घेणे, हा यामागील उद्देश असल्याचे सुत्रांनी सांगितले. शस्त्र हातात घेणाऱ्यांची गय केली जाणार नाही; पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्याचा इशारा

14 फेब्रुवारीला जम्मू काश्मीर मधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात CRPF चे 40 जवान शहीद झाले. त्यानंतर तीन दहशतवाद्यांना ठार करण्यात भारतीय सैनिकांना यश आलं. तर हल्ल्याचा सुत्रधार गाजी रशीदचा खात्मा करण्यात आला. मात्र या पार्श्वभूमीवर देशभरात हाय अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.