LIC (Photo Credits: Twitter)

अर्थ मंत्रालयाने आज एलआयसी एजंट आणि कर्मचार्‍यांना गणेश चतुर्थीच्या तोंडावर आज मोठं गिफ्ट दिलं आहे. अर्थमंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, त्यांनी वेलफेअर मेजर्सला मंजूरी दिली आहे. त्यामुळे त्याचा फायदा एजंट आणि कर्मचार्‍यांना ग्रॅज्युईटी मध्ये वाढ, विमा संरक्षणात वाढ, कर्मचाऱ्यांसाठी टर्म इन्शुरन्स कव्हर वाढ करू झाला आहे. याचा फायदा लाखो कर्मचारी आणि एजंट्सला झाला आहे. भारतीय जीवन बीमा निगम अर्थात एलआयसी ही देशातील सर्वात मोठी विमा कंपनी आहे. एलआयसीची सर्वात मोठी ताकद हे त्याचे एजंट आहेत परंतु विमा कंपनीचा बाजारातील हिस्सा बर्‍याच काळापासून घसरत आहे. त्यामुळे आता या घोषणांनी एजंट्सना खूष ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

पहा एलआयसीसाठी  सरकार कडून करण्यात आलेल्या घोषणा

1. एलआयसी एजंटसाठी ग्रॅच्युइटीची मर्यादा 3 लाख रुपयांवरून 5 लाख रुपये करण्यात आली आहे. याचा फायदा त्यांच्या कामाच्या परिस्थितीत सुधारणा करण्यासाठी होणार आहे तसेच एलआयसी एजंटना देखील फायदा होणार आहे.

2. एलआयसी एजंटसाठी मुदतीचे विमा संरक्षण वाढविण्यात आले आहे. कर्मचाऱ्यांसाठी टर्म इन्शुरन्स कव्हर 3000-10,000 रुपयांवरून 25,000-1,50,000 रुपयांपर्यंत वाढवण्यात आले आहे. मुदत विम्याची रक्कम वाढवून, निधन झालेल्या एलआयसी एजंटच्या कुटुंबांना आर्थिक मदत मिळू शकेल, ज्यामुळे त्यांना अधिक कल्याणकारी लाभ मिळू शकतील.

3. एलआयसी कर्मचार्‍यांच्या कल्याणासाठी त्यांना 30 टक्के समान दराने कौटुंबिक पेन्शन मिळणार आहे.

दरम्यान एलआयसी चे 13लाखाहून अधिक एजंट्स आणि लाखाभरापेक्षा जास्त नियमित कर्मचारी आहेत. या सार्‍यांना अर्थ मंत्रालयाच्या या घोषणांचा फायदा होणार आहे.