नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने प्रवास सुलभतेसाठी Air Suvidha Portal  केले अनिवार्य
Travel | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

भारतात येणार्‍या आंतरराष्ट्रीय प्रवाशांचा प्रवास सुविहित व्हावा यासाठी नागरी विमान वाहतूक मंत्रालय तसेच आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने एअर सुविधा पोर्टलवर स्वतःची माहिती संपर्करहित पद्धतीने जाहीर करणे अनिवार्य केले आहे.  भारतात आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे आगमन सुलभ करण्यासाठी एअर सुविधा (Air Suvidha Portal) हे अशाप्रकारचे पहिलेच डिजिटल पोर्टल आहे. सध्या, हे राज्य अधिकाऱ्यांना संपर्कांचा माग घेण्यासाठी मदत करते. भारतात येणाऱ्या सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांना त्रासमुक्त, रांगमुक्त आणि सोयीस्कर हवाई प्रवास प्रदान करणे हा एअर सुविधाच्या अंमलबजावणीचा हेतू आहे. 30 नोव्हेंबर 2021 रोजी नवीन प्रवास मार्गदर्शक तत्त्वे जारी केल्यापासून 1 डिसेंबर 2021 ते 05 डिसेंबर 2021 या काळात एअर सुविधा पोर्टलने 2,51,210 प्रवाशांना सहाय्य केले आहे. शिवाय, 20 ऑगस्ट 2020 मध्ये सुरू झाल्यापासून 1 कोटीहून अधिक प्रवाशांना एअर सुविधा पोर्टलचा फायदा झाला आहे. Revised Guidelines for International Travellers In India: भारतामध्ये Omicron Variant च्या पार्श्वभूमीवर 'At-Risk'देशातून येणार्‍यांना विमानतळावर COVID-19 Testing बंधनकारक .

कोविड-19 विषाणूच्या ओमायक्रॉन प्रकारा विरोधातील आवश्यक उपाययोजना सुनिश्चित करण्यासाठी, एअर सुविधा पोर्टलवर माहिती भरण्यापासून सूट देणारा अर्ज बंद करण्यात आला आहे, आणि भारतात येणाऱ्या सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी हा तपशील भरणे अनिवार्य केले आहे. सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांना विमानात चढण्यापूर्वी आवश्यक कागदपत्रांसह एअर सुविधा पोर्टलवर त्यांची सद्य आरोग्य स्थिती घोषित करणे बंधनकारक आहे:

प्रवासी आणि आरोग्य/राज्य अधिकार्‍यांसाठी एअर सुविधा अधिक अनुकूल बनवण्यासाठी अद्यतने

'जोखीम असलेल्या' देशांमधील सर्व अर्ज एच आणि लाल बँडने चिन्हांकित आहेत आणि इतर अर्ज हिरव्या रंगात आहेत.

'जोखीम असलेल्या' देशांमधील ' अर्ज अधोरेखित करण्यासाठी गेल्या 14 दिवसांत भेट दिलेल्या देशांची माहिती विचारली जाते.

ड्रॉप-डाउन सूची प्रदान करून फील्डचे मानकीकरण उदा. पत्त्यासाठी जिल्हा आणि राज्य.

पोर्टलच्या सुरूवातीला अद्ययावत FAQ सूची आणि ग्राहक सेवा लिंकसह नवीनतम सल्लागार उपलब्ध करणे.

‘जोखीम असलेल्या’देशांसाठी प्रवाशांना त्यांच्या आगमन चाचणीसाठी पूर्वनोंदणी करण्याचा सल्ला दिला जातो आणि एसडीएफ सादर करताना प्रवाशांना संबंधित चाचणी सुविधेची लिंक दिली जाते.

सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांना जोखीम असलेल्या देशांमधून येताना/परिगमन करताना खालील उपायांचे पालन करणे बंधनकारक आहे

•एअर सुविधा पोर्टलवर स्व-घोषणा अर्ज भरा

•निगेटिव्ह आरटी-पीसीआर अहवाल अपलोड करा (प्रवासाच्या आधी 72 तासांच्या आत केलेला)

•विमानतळावर आगमनानंतरची कोविड-19 चाचणी (स्वखर्चाने)

•7 दिवसांसाठी गृह विलगीकरण,

•8 व्या दिवशी पुन्हा चाचणी आणि निगेटिव्ह असल्यास, पुढील 7 दिवसांसाठी स्व-आरोग्य निरीक्षण

अशा देशांची यादी जिथून प्रवाशांना भारतात आगमन झाल्यावर अतिरिक्त उपायांचे पालन करावे लागेल, ज्यात आगमनोत्तर चाचणी (जोखीम असलेले देश) (6 डिसेंबर 2021 रोजी अद्यतनित)

1. युनायटेड किंगडमसह युरोपमधील देश

2. दक्षिण आफ्रिका

3. ब्राझील

4. बोत्सवाना

5. चीन

6. घाना

7. मॉरिशस

8. न्यूझीलंड

9. झिम्बाब्वे

10. सिंगापूर

11. टांझानिया

12. हाँगकाँग

13. इस्रायल