राजस्थान: वायुसेनेचे MiG-21 हे लढाऊ विमान बिकानेर येथे कोसळले; पायलटला सुखरुप बाहेर पडण्यात यश
Representational Image (Photo Credit: PTI)

राजस्थान (Rajasthan) येथील बिकानेर (Bikaner) येथे MiG-21 हे लढाऊ विमान कोसळले असल्याची माहिती समोर येत आहे. या दुर्घटनेत वैमानिक (Pilot) विमानातून सुखरुप बाहेर पडला आहे. उड्डाणानंतर काही वेळातच इंजिनात बिघाड झाल्याने हे विमान कोसळले. मात्र या दुर्घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. या दुर्घटनेत कोणतीही हानी झाल्याच्या वृत्त अद्याप आलेले नाही.

12 फेब्रुवारीला भारतीय वायुसेनेचे  मिग-27 हे लढाऊ विमान राजस्थान येथील जॅसलमेर जिल्ह्यातील पोखरण येथे कोसळले होते. याचा परिणाम संपूर्ण गावावर झाला होता. मात्र कर्नल सोंबित घोष यांनी दिलेल्या माहितीनुसार, पायलटला सुरक्षित बाहेर काढण्यात आले होते.