भारतामध्ये सध्या नागरिकत्त्व कायदा लागू करण्याच्या निर्णयावरून संमिश्र प्रतिक्रिया समोर येत आहेत. काही ठिकाणी लोकांनी सीएएच्या समर्थानार्थ आवाज उठवला आहे तर समाजातील विशिष्ट स्तरातील लोकांनी आंदोलन करत आपला निषेध नोंदवला आहे. दरम्यान अमेरिकेमध्ये 'मायक्रोसॉफ्ट' या कंपनीचे सीईओ सत्या नडेला (Satya Nadella) यांनी एका खास कार्यक्रमामध्ये आपलं मत व्यक्त करताना भारतामध्ये सध्या जी स्थिती त्याबद्दल 'दु:ख' व्यक्त करण्यात आलं. त्यानंतर मायक्रोसॉफ्टने एक पत्रक जारी करत सत्य नडेला यांची बाजू स्पष्ट केली आहे.
मायक्रोसॉफ्टने जाहीर केलेल्या भूमिकेमध्ये त्यांनी प्रत्येक देशाला आपली सुरक्षा, सीमाप्रश्न आणि निर्वासितांबाबतच्या भूमिकेबद्दल निर्णय हा अंतिम आहे. 'माझं बालपण भारतामध्ये विविध संस्कृतींच्या सानिध्यामध्ये गेलं. आता मला जे अमेरिकेमध्ये मिळालं तसंच भारतामध्ये निर्वासितांकडून भारताच्या विकासाचं काम व्हावं. अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
मायक्रोसॉफ्टचं ट्वीट
Statement from Satya Nadella, CEO, Microsoft pic.twitter.com/lzsqAUHu3I
— Microsoft India (@MicrosoftIndia) January 13, 2020
दरम्यान काल अमेरिकेमध्ये मॅनहॅटनमध्ये सत्य नडेला यांनी बझ फीडच्या एडिटर इन चीफला दिलेल्या मुलाखतीच्या उत्तारामध्ये भारतात भविष्यात मका एखादा बांग्लादेशी इंफोसिसचा सीईओ होताना पहायला आवडेल. माझ्यासोबत अमेरिकेमध्ये तसंचं झालं. याला आकांक्षा म्हणतात. माझ्याबरोबर जे अमेरिकेत झालं तसंच इतर निर्वासितांबद्दल भारतामध्ये झालेलं पहायला आवडेल.
भारतामध्ये 10 जानेवारीपासून नागरिकत्व कायदा लागू करण्यात आला आहे. या कायद्याला प्रामुख्याने ईशान्य भारतामधून तीव्र विरोध करण्यात येत आहे. तसेच पश्चिम बंगाल, आसाम सह राज्यातील 8 पेक्षा अधिक राज्यांनी आपला निषेध दर्शवला आहे.