
पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील फरार आरोपी मेहुल चोक्सी (Mehul choksi)ला बेल्जियम मध्ये बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. पीएनबी बँकेच्या कर्ज घोटाळ्यातील आरोपी असलेला मेहुल हिरे व्यापारी आहे. मीडीया रिपोर्ट्स नुसार, सीबीआय च्या अपील वरून मेहुल चोक्सीला अटक करण्यात आली आहे. मेहुल अटक टाळण्यासाठी भारताबाहेर गेला होता. भारतीय केंद्रीय तपास यंत्रणा ईडी, सीबीआय च्या विनंतीवरून ही अटक करण्यात आली आहे. मुंबई न्यायालयानेही त्याच्याविरुद्ध जारी केलेल्या अजामीनपात्र वॉरंटनंतर ही अटक करण्यात आली आहे.
2018 पासून फरार असलेल्या चोक्सीला 12 एप्रिल रोजी बेल्जियममधील एका रुग्णालयातून ताब्यात घेण्यात आले होते, जिथे त्याच्यावर उपचार सुरू होते. भारतीय अधिकाऱ्यांनी प्रत्यार्पणाचे प्रयत्न वाढवल्यानंतर काही दिवसांनी त्याला अटक करण्यात आली. सूत्रांनी सांगितले की, ईडी आणि सीबीआयने त्याला भारतात परत आणण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केल्यानंतर लगेचच तो प्रकृती अस्वास्थ्याचे कारण देऊन युरोपला गेला होता. बेल्जियम पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले तेव्हा तो रुग्णालयात होता.
मेहुल चोक्सीला अटक
Fugitive businessman Mehul Choksi arrested by Belgium authorities on CBI's request
Read @ANI Story | https://t.co/1mJIPbwdYl#MehulChoksi #CBI #Belgium pic.twitter.com/KeLpMrlGl1
— ANI Digital (@ani_digital) April 14, 2025
मेहुल चोक्सी विरुद्ध इंटरपोल रेड नोटीस रद्द झाल्यानंतर भारतीय एजन्सींनी प्रत्यार्पणाच्या विनंत्या केल्या होत्या त्यानंतरच त्याची अटक करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. अधिकाऱ्यांच्या मते, त्याला भारतात परत आणण्यासाठी आता प्रयत्न सुरू आहेत. बेल्जियमच्या न्यायालयांमधील कायदेशीर अडचणींमुळे प्रक्रियेला विलंब होऊ शकतो. चोक्सी कायदेशीर बचाव करेल अशी अपेक्षा आहे, ज्यामुळे प्रत्यार्पणाची प्रक्रिया लांबू शकते.
मनी लाँड्रिंग प्रकरणाच्या संदर्भात, ईडी मुंबई न्यायालयामार्फत चोक्सीला Fugitive Economic Offenders Act फरार आर्थिक गुन्हेगार घोषित करण्यासाठी कार्यवाही करत आहे. दरम्यान, चोक्सीचा पुतण्या नीरव मोदी देखील आरोपी आहे. तो सध्या ब्रिटनच्या तुरुंगात आहे. त्याच्याकडूनही भारतीय अधिकाऱ्यांनी सुरू केलेल्या प्रत्यार्पणाच्या कारवाईला आव्हान दिले जात आहे.