RBI Governor Shaktikanta Das (Photo Credits: ANI)

भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गर्व्हनर शक्तिकांत दास (Shaktikanta Das) यांनी आज आरबीआयचे द्वैमासिक पतधोरण जाहीर केले आहे. यानुसार रेपो रेटमध्ये कोणतेही बदल करण्यात आले नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. यात रेपो रेट 4.2% तर रिव्हर्स रेपो रेट (Reverse Repo Rate) 3.35% वर कायम ठेवण्यात आला आहे. RBI ची सलग 3 दिवस सुरु असलेली ही बैठक आज संपणार आहे. त्यामुळे या बैठकीत महत्त्वाचे निर्णय झाले. RBI गर्व्हनर शक्तिकांत दास यांनी घेतलेल्या बैठकीत व्याज दरांत काही विशेष बदल करण्यात आले नसल्याचे सांगण्यात येत आहे. आरबीयआयच्या मॉनिटरी पॉलिसी (RBI Monetary Policy) ने व्याज दरात काही विशेष बदल केले नेसून EMI मध्येही विशेष सवलत देण्यात आलेली नाही.

या पत्रकार परिषदेत 2021 मध्ये GDP मध्ये 9.5% घसरण होण्याची शक्यता आहे असे शक्तिकांत दास यांनी सांगितले आहे. RBI Monetary Policy: रेपो रेट 4% तर रिव्हर्स रेपो रेट 3.3% कायम

आरबीआय गर्व्हनर शक्तिकांत दास यांनी पत्रकार परिषदेत सांगितलेले महत्त्वाचे मुद्दे:

1. रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेटमध्ये बदल केले नसून अनुक्रमे 4.2% आणि 3.35% वर कायम ठेवण्यात आले आहे.

2. ग्राहकांना EMI वा लोनच्या व्याजदरावर कोणतीही सूट देण्यात आलेली नाही.

3. वैश्विक अर्थव्यवस्था मध्ये रिकव्हरीचे संकेत मिळत आहेत.

4. चालू वित्त वर्षात तिमाहीच्या अंतिम टप्प्यात GDP मध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. सर्व सेक्टर्समध्ये वाढ झालेली पाहायला मिळत आहे.

5. वित्त वर्षाच्या पहिल्या सहा महिन्याच्या टप्प्यात हळूहळू सुधार होऊन दुस-या सहा महिन्यात याला गती मिळू शकते.

केंद्रीय बँक द्वारा हाउसिंग लोनवर रिस्क वेटेज थोडे कमी करण्यात आले आहे. त्याचबरोबर संकटसमयी डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी RTGS ला 24 तासांमध्ये लागू करण्याचा प्रस्ताव आहे.