भारताच्या रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाचे गर्व्हरनर शक्तिकांत दास (RBI Governor Shaktikanta Das) यांनी आज (5 ऑगस्ट) पत्रकार परिषद घेत देशाच्या अर्थव्यवस्थेचा सहामाहीचा लेखाजोखा मांडला आहे. आर्थिक पतधोरण (RBI Monetary Policy) जाहीर करताना देण्यात आलेल्या माहितीनुसार, देशात रेपो रेट (Repo Rate) 4% तर रिव्हर्स रेपो रेट (Reverse Repo Rate) 3 .3% कायम रहणार आहे. त्याच्यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. यावेळेस माहिती देताना त्यांनी कोरोना संकटाचा देशाच्या अर्थव्यवस्थेला फटका बसला आहे असे सांगताना त्यांनी दिलेली अजून एक दिलासादायक बाब म्हणजे आता देशाची अर्थव्यवस्था सुधारण्यास सुरूवात झाली आहे.
आरबीआय गर्व्हरनर शक्तिकांत यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशात एप्रिल महिन्याच्या तुलनेत आता देशाची अर्थव्यवस्था हळूहळू सुधारायला सुरूवात झाली आहे. मात्र देशात महागाई दर वाढताच आहे. 2020-21 मध्ये देशाचा जीडीपी रेट निगेटीव्ह मध्येच राहणार असल्याची माहिती त्यांनी यावेळेस दिली आहे. भारतामध्ये यंदा चांगल्या पावसामुळे खरिपाच्या पेरणीतही वाढ झाली आहे.
ANI Tweet
Reverse repo rate also remains unchanged at 3.3%: RBI Governor Shaktikanta Das https://t.co/Z6EnJlO6u6
— ANI (@ANI) August 6, 2020
करोना संकटामुळे 2020 च्या पहिल्या सहामाही मध्ये जागतिक अर्थव्यवस्थेत मोठी घरसण झाल्याचं चित्र आहे. करोनाच्या प्रादुर्भावामुळे आयातीवर मोठा परिणाम झाला आहे. सध्या जगभरातील उत्पादन आणि सेवा क्षेत्रालाही याचा मोठा फटका बसला आहे.