Manohar Parrikar Death (File Photo)

मनोहर पर्रीकर (Manohar Parrikar) यांच्या निधनानंतर केंद्र सरकारने उद्या राष्ट्रीय दुखवटा (National Mourning ) जाहीर केला आहे. गोव्यासह देशातील साऱ्या राज्यांमध्ये आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये उद्या (18 मार्च) भारताचा झेंडा अर्ध्यावर उतरवण्यात येणार आहे. आज (17 मार्च) संध्याकाळी मनोहर पर्रीकर निधन झाले आहे. मागील काही महिन्यांपासून पर्रीकर स्वादुपिंडाच्या कर्करोगाने (Pancreatic Cancer ) ग्रस्त होते. अमेरिका,दिल्ली आणि मुंबईमध्ये त्यांच्यावर उपचार करण्यात आले होते. मात्र अखेर आज गोव्यात राहत्या घरी त्यांचे निधन झाले. उद्या गोव्यामध्ये मनोहर पर्रीकर यांच्यावर अंतिम संस्कार होणार आहेत. मनोहर पर्रिकर यांचे निधन: नरेंद्र मोदी, नितीन गडकरी यांच्यासह अनेक राजकीय दिग्गजांची ट्विटरच्या माध्यमातून श्रद्धांजली

ANI ट्विट 

गोव्याचे मुख्यमंत्री पद त्यांनी तीन वेळेस सांभाळले. त्यानंतर मोदी सरकारच्या कार्यकाळात मनोहर पर्रीकर हे संरक्षण मंत्री होते. मात्र गोव्यातच त्यांचे मन अधिक रमल्याने संरक्षणमंत्री पदाचा त्याग करून ते गोव्यात परतले होते.