Former PM PV Narasimha Rao. (Photo Credits: PTI)

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज (28 जून) रोजी 'मन की बात' (Maan Ki Baat) या कार्यक्रमातून जनतेशी संवाद साधला. आजच्या कार्यक्रमात ते विविध विषयांवर बोलले. 2020 हे वर्ष, कोरोना व्हायरस, लॉकडाऊन, आत्मनिर्भर भारत, भारत-चीन झटापट, शहीद जवान या विविध विषयांवर संवाद साधला. अखेरीस मोदी यांनी माजी पंतप्रधान पी.व्ही. नरसिंहराव (Former Prime Minister, PV Narasimha Rao) यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली अर्पण केली. तसंच त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त योगदान, कारकीर्द याविषयी माहिती देिली आणि त्यांच्याबद्दल अधिकाधिक जाणून घेण्याचे नागरिकांना आवाहन केले. (Mann Ki Baat: भारत लॉकडाऊनच्या टप्प्यातून बाहेर पडला असून अनलॉकच्या टप्प्यात आला आहे- पंतप्रधान नरेंद्र मोदी)

पुढे मोदी म्हणाले, "माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांनी किशोरवयातच भारताच्या स्वातंत्र्य आंदोलनात सहभागी झाले होते. जेव्हा हैद्राबादच्या निजामांनी वन्दे मातरम् विरुद्ध परवानगी नाकारली होती. तेव्हा त्याविरुद्धच्या आंदोलनातही ते सहभागी झाले होते. त्यावेळी त्यांच वय अवघे 17 वर्षांचे होते. लहान वयापासून त्यांनी अन्यायविरुद्ध आवाज उठवला. नरसिंहराव यांना इतिहासाबद्दल खूप चांंगली समज होती." नरसिंहराव हे अगदी सर्वसाधारण कुटुंबातून आले होते. प्रगती करणे, शिक्षणावर भर देणे, शिक्षणाची प्रवृत्ती आणि नेतृत्व क्षमता हे त्यांचे गुण स्मरणीय आहेत. त्यामुळे त्यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या विचारांबद्दल अधिकाधिक जाणून घेण्याचा आग्रही मोदींनी केला आहे.

PMO India Tweet:

तसंच 2020 हे वर्ष वाईट आहे असे समजू नका. संकटे आपल्याला आव्हानं पेलण्याची शक्ती देतात. संकटांना समोरे जाण्याची भारताची परंपरा आहे. असे सांगत मोदींनी देशवासियांचे मनोबल वाढवले आहे. दरम्यान 2020 हे वर्ष  भारताला नवी दिशा देईल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.