Prime Minister Narendra Modi | (Photo Credit: ANI)

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज 'मन की बात' (Mann Ki Baat) या रेडिओ कार्यक्रमातून जनतेशी संवाद साधला. तसेच लोकांच्या मनात कोरोना व्हायरसला घेऊन जे वादळ निर्माण झालं आहे ते शांत करण्याचा प्रयत्न केला. आपल्याला अनेक लोकांकडून असे ऐकायला मिळाले की, '2020 वर्ष फार वाईट आहे त्यामुळे हे लवकरात लवकर संपावे, पण संकटामुळे कोणतेही वर्ष वाईट नसतं उलट त्यावर तुमची मात करण्याची गरज असते. ज्यामुळे तुम्ही ते चांगले बनवू शकता' असे मोदी म्हणाले. भारत लॉकडाऊनच्या (Lockdown) टप्प्यातून बाहेर पडला असून अनलॉकच्या (Unlock) टप्प्यात आला आहे असेही ते यावेळी म्हणाले.

"याआधीही भारतासमोर अनेक संकटे, अनेक आव्हाने आली. मात्र भारताचा इतिहास आहे की सर्व भारतीयांनी एकजूट होऊन त्यावर मात केली. तसेच मनोबल यावेळी तुम्हाला सर्वांना दाखवायचे आहे" असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. Coronavirus Update: भारतात COVID-19 रुग्णांच्या आतापर्यंतची सर्वाधिक वाढ; 19,906 नव्या रुग्णांसह देशात एकूण कोरोना बाधितांची संख्या 5,28,859 वर

तसेच लडाख येथे शहीद झालेल्या जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत "भारत जर मित्रता निभवणे जाणतो, तर डोळ्यात डोळे घालून योग्य वेळेस योग्य ते उत्तर देणेही जाणतो, तेच आमच्या शहीद जवानांनी दाखवून दिले आहे" असेही ते यावेळी म्हणाले.

लडाख मध्ये झालेल्या हल्ल्याला भारताकडून चोख उत्तर देण्यात आले आहे असा उल्लेखही त्यांनी यावेळी केला. सध्या देश लॉकडाऊनच्या टप्प्यातून बाहेर आला असून अनलॉकच्या टप्प्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी सावधगिरी, सतर्कता बाळगणे गरजेचे आहे असे मोदी म्हणाले. नियमांचे उल्लंघन करुन धोका वाढवू नका असे आवाहन पंतर्धानांनी यावेळी केले.