Pigs | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com

हृदयविकाराचा झटका (Heart attack) येऊन खाली कोसळळेल्या व्यक्तीच्या शरीराचे डुकरांनी लचके तोडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना राजस्थान (Rajasthan) राज्यातील कोटा शहरात असलेल्या नारायणपूरा बस स्थानक (Nayapura police station) परिसरात घडली. सांगितले जात आहे की, रविवारी (29 मे) सायंकाळी कार्डीयाक अरेरेस्ट (Cardiac Arrest) आल्याने 62 वर्षे वयाचा सदर व्यक्ती खाली कोसळला. तो निपचीत पडलेला पाहून आजूबाजूला भटक असलेली डुकरे गोळा झाली. त्यांनी त्याच्या शरीराचे लचके तोडले.

एका व्यक्तीच्या शरीराचे डुकरांकडून लचके तोडले जात असल्याची घटना बसस्थानक परिसरात हमाली करणाऱ्या एका व्यक्तीने पाहिले. डुकरांच्या तोंडाला लागलेले रक्त आणि रक्ताने माखलेला त्या व्यक्तीचा मृतदेह पाहून तो हामालही काही काळ गोंधळून गेला. त्यानंतर त्याने आरडाओरडा करत नागरिकांना बोलावण्याचा प्रयत्न केला. तसेच, पोलिसांशीही संपर्क साधला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवून दिला. जो नंतर त्याच्या नातेवाईकांकडे अंत्यसंस्कारासाठी सोपविण्यात आला.

नयापुरा पोलिस स्टेशनचे सर्कल इन्स्पेक्टर भूपेंद्र सिंह यांनी सांगितले की, भरतसिंग झाला (62) असे मृताचे नाव आहे. तो झालावार जिल्ह्यातील झालरापाटन पोलीस स्टेशन हद्दीतील परोलियावाला गावचा रहिवासी आहे. झाला हे रविवारी दुपारी नयापुरा बस स्टँडवर आराम करण्यासाठी बसमधून उतरले. दरम्यान, त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने ते जागीच कोसळले.