पश्चिम बंगाल (West Bengal) मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांचा एक फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये पश्चिम बंगाल मधील प्रख्यात व्यक्ती रविंद्रनाथ टागोर, नेताजी सुभाष चंद्र बोस आणि स्वामी विवेकानंद यांच्यासारखे नोबेल पुरस्कार विजेते दिसून येत आहेत. तर या फोटोवर फेमस बंगाली लिजेंड्स असे लिहिले गेले आहे. मात्र सोशल मीडियावर या फोटोमुळे प्रचंड टीका करण्यात येत आहे.
तर एका विद्यार्थ्याने याबाबत टीका करत असे लिहिले आहे की, ममता बॅनर्जी पश्चिम बंगाल मधील चांगल्या नेता होऊ शकतात. मात्र त्यांची तुलना प्रसिद्ध लोकांसोबत लावणे हे चुकीचे आहे. टीएमसीच्या नेत्यांना याबाबत विचारले असता त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.(हेही वाचा-पुन्हा एकदा त्या 'लकी खुर्ची'ची चर्चा; नरेंद्र मोदी या खुर्चीवर बसल्यास विजय पक्का, BJP नेत्यांचा समज)
तर काहींनी बंगाली लोकांचा अपमान करु नये असे म्हटले आहे. त्यामुळे राजकीय नेत्यांचे अशा पद्धतीने फोटो लावणे म्हणजे बंगाली दिग्गज मंडळींचा अपमान असल्याचे ही सोशल मीडियावर टीका करण्यात आली आहे.