मालदीवचे माजी उपराष्ट्रपती अहमद अदीब अब्दुल गफूर यांना भारतात अटक
Ahmed Adeeb, the Maldives Former Vice-President. (Photo Credits: ANI)

मालदीवचे माजी उपराष्ट्रपती अहमद अदीब अब्दुल गफूर (Ahmed Adeeb Abdul Ghafoor) यांना भारतात अटक झाली आहे. तामिळनाडूतील (Tamil Nadu) तूतीकोरिन पोर्ट (Tuticorin Port) येथे ही घटना घडली. अहमद अदीब अब्दुल गफूर हे भारतात बेकायदेशीररित्या दाखल होत असल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला आणि त्यामुळेच त्यांना भारतीय तपास यंत्रणेकडून अटक करण्यात आली आहे. ('मुक्त व्यापार करार' एक चूक, मालदीवचा चीनला धक्का; भारताला दिलासा)

भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता रवीश कुमार (Raveesh Kumar) यांनी सांगितले की, "याप्रकरणी आम्ही सत्यता तपासण्याचा प्रयत्न करत आहोत. आम्ही मालदीव सरकारशी संपर्क करुन या प्रकरणातील सत्यता पडताळून पाहू." (नाट्यमय घडामोडींनतर मालदीवमध्ये सत्तापालट; इब्राहिम सोलिह विजयी)

ANI ट्विट:

काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, अहमद अदीब अब्दुल गफूर हे बेकायदेशीररित्या भारतात दाखल होण्याचा प्रयत्न करत होते. मात्र याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.