कुणाच्या एका चुकीचे परिणाम कधी कुणावर कसे होवू शकतात हे सांगण्याचा काही नेम नाही. किंबहूना एकाच्या चुकीची शिक्षा कित्येकांना भोगावी लागेल असेही होवू शकते. विमान प्रवासादरम्यान विमान कंपनीकडून प्रवाशाच्या मागणी प्रमाणे त्याचा पाणी, जेवण, मद्यपान अशा विविध सुविधा पुरवल्या जातात. पण आता विमान प्रवासादरम्यान मद्यपानाबाबत एअर इंडियाकडून विशेष नियमावली जारी करण्यात आली आहे. हो म्हणजे तुम्ही एअर इंडियाच्या नॅशनल किंवा इंटरनॅशनल विमानाने प्रवास करीत असल्यास तुम्हाला प्रवासादरम्यान काही विशेष नियम पाळावे लागणार आहेत. तर नुकत्याच एअर इंडिया विमानात घडलेल्या लघुशंका प्रकरणानंतर एअर इंडियाकडून खबरदारी तसेच पुन्हा अशा प्रकारच्या घटनांना आळा बसावा यासाठी विमान प्रवासादरम्यान मद्यपानाविषयी विशेष नियमावली जारी करण्यात आली आहे. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयानं (DGCA) टाटा समूहाच्या मालकीच्या विमान कंपनीला (एअर इंडिया) गेल्या काही दिवसांत दोन आंतरराष्ट्रीय उड्डाणांमध्ये प्रवाशांशी असभ्य वर्तन केल्याबद्दल दंड ठोठावला आहे.

 

एअर इंडियाने जारी केलेल्या नव्या नियमानुसार क्रू मेंबर्सच्या परवानगीशिवाय आता प्रवाशांना मद्यपान करता येणार नाही. क्रू मेंबर्सनी मद्य प्राशन करणाऱ्या प्रवाशांच्याबाबतीत दक्ष राहावं. तरी आता प्रत्येक प्रवाशांने मागतलं म्हणून मद्य क्रू मेंबर्सने द्याव असंचं नाही. तर प्रत्येक प्रवाशांना आता मद्य देण्याचं विशेष प्रमाण ठरवण्यात आलं आहे. ठरलेल्या प्रमाणानुरचं क्रू मेंबर्स प्रवाशांना मद्य देतील पण प्रवाशाने अधिक मद्य मागितल्यास त्याला नकार देण्याची परवानगी क्रू मेंबर्सला आहे. (हे ही वाचा:- Air India Urination Case: एअर इंडिया विमानात महिलेवर लंघूशंका केल्याप्रकरणी कंपनीने आरोपी शंकर मिश्राच्या विमान प्रवासावर घातली पुढील 4 महिने बंदी)

 

एअरलाइन्सनं यूएस नॅशनल रेस्टॉरंट असोसिएशन (NRA) च्या मार्गदर्शक तत्त्वांवर आधारित फ्लाइटमध्ये अल्कोहोल ऑफर करण्याच्या सध्याच्या धोरणात बदल केले आहेत. इतर एअरलाइन्सनं अवलंबलेल्या पद्धतीचाच एअर इंडिया आता अवलंब करणार आहे. एअर इंडियाच्या प्रवक्त्यांकडून या संबंधित माहिती देत निवेदन देण्यात आले आहे. आजपासून म्हणजे 24 जानेवारी पासून एअर इंडियाच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रवासादरम्यान सुधारित धोरणाशी संबंधित बाबी लागू करण्यात आल्या आहेत.