Air India Urination Case: एअर इंडिया विमानात महिलेवर लंघूशंका केल्याप्रकरणी कंपनीने आरोपी शंकर मिश्राच्या विमान प्रवासावर घातली पुढील 4 महिने बंदी
Air India | (Photo Credits: Facebook)

Air India Urination Case: 26 नोव्हेंबर 2021 रोजी एअर इंडियाच्या फ्लाइटमध्ये एका महिला प्रवाशावर लघवी केल्याचा आरोप असलेल्या शंकर मिश्रा (Shankar Mishra) यांच्यावर एअर इंडियाने बंदी घातली आहे. एअर इंडियाने शंकर मिश्रा यांच्यावर 4 महिन्यांची बंदी घातली आहे. आता शंकर मिश्रा हे चार महिने एअर इंडियाच्या फ्लाइटमध्ये प्रवास करू शकणार नाहीत.

शंकर मिश्रा यांच्यावर महिला प्रवाशावर लघवी केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी शंकर मिश्रा यांना 7 जानेवारीला अटक करण्यात आली होती. आरोपी मिश्राला बेंगळुरू येथून अटक करण्यात आली. शंकर मिश्रा 42 दिवसांपासून फरार होता. पोलिसांनी मोबाईल लोकेशनच्या मदतीने आरोपींचा माग काढला होता. तो मुंबईचा रहिवासी आहे. (हेही वाचा - Air India Urination Case: एअर इंडियाच्या विमानात लघुशंका घोटाळ्याला महिलाच जबाबदार; आरोपी शंकर मिश्रा यांच्या वकिलाचा दावा)

याप्रकरणी महिला प्रवाशाने तक्रार केली होती, त्यानंतरच हे प्रकरण सर्वांसमोर आले. महिलेने यासंदर्भात तक्रार करताना म्हटलं होतं की, “मी एअर इंडियाच्या फ्लाइट AI102 मधील माझ्या बिझनेस क्लासच्या प्रवासादरम्यान घडलेल्या भयानक घटनेची माहिती देण्यासाठी लिहित आहे. फ्लाइट दरम्यान, दुपारच्या जेवणानंतर काही वेळातच दिवे बंद झाले. यानंतर मी झोपण्याच्या तयारीत होते, तेव्हा एका मद्यधुंद प्रवाशाने माझ्यावर लघवी केली."

महिला प्रवाशाने एअर इंडियाकडे रीतसर तक्रार केल्यामुळे आंतरराष्ट्रीय विमानात लघवीची घटना जवळपास महिनाभरानंतर उघडकीस आली. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला. शंकर मिश्रा यांच्या वकिलांनी खटला फेटाळत अनेक विधाने जारी केली आहेत. मात्र, न्यायालयाने त्यांना अद्याप जामीन मंजूर केलेला नाही.

या प्रकरणाच्या ताज्या घडामोडीत, शंकर मिश्रा यांच्या वकिलाने दावा केला की, त्यांच्या अशिलाने महिलेवर लघवी केली नाही. स्त्रीने स्वत: लघवी करून शंकर मिश्रा यांच्यावर आरोप लावले. त्यांनी आपल्या युक्तीवादात संबंधित महिला नर्तक असून अनेक कथ्थक नर्तकांमध्ये लघवीच्या असंयमाची समस्या असल्याचे म्हटले. मिश्रा यांच्या वकिलाच्या या वक्तव्याचा जोरदार निषेध करण्यात आला.