Mahaparinirvan Din 2020: महापरिनिर्वाण दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, रामदास आठवले यांच्यासह 'या' नेत्यांनी केले अभिवादन
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Photo Credits-Twitter)

Mahaparinirvan Din 2020: देशभरात आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांचा 64 वा महापरिनिर्वाण दिन साजरा केला जात आहे. तर कोरोनाच्या पार्श्वभुमीवर महापरिनिर्वाण दिन अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात यावा असे आवाहन करण्यात आले आहे. मुंबईतील चैत्यभुमीवर पत्र पाठवून बाबासाहेबांना अभिवादन करावे असे आवाहन करण्यात आले होते. आजच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narednra Modi), अमित शहा (Amit Shah), मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray), रामदास आठवले (Ramdas Athawale) यांच्यासह अन्य नेत्यांनी बाबासाहेबांना वंदन केले आहे.(Mahaparinirvan Din 2020 Banner: डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनी मराठी Messages, Images द्वारे या महापुरुषास करा विनम्र अभिवादन)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत असे म्हटले आहे की, बाबासाहेबांचे विचार आणि त्यांचा आदर्श हा कोटी लोकांना बळ देतो. आपल्या राष्ट्रासाठी त्यांनी पाहिलेली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महापरिनिर्वाण दिनानिमित्त म्हटले आहे.(Dr Babasaheb Ambedkar Quotes: महापरिनिर्वाण दिन निमित्त बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार Facebook, WhatsApp द्वारा शेअर करत महामानवाला करा अभिवादन)

Tweet:

 

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या महापरिनिर्वाण दिवाळीनिमित्त अभिवादन केले आहे. त्यांनी ट्विट मध्ये असे म्हटले आहे की, "बाबासाहेबांच्या पावलावर पाऊल टाकत मोदी सरकार दशकांपासून वंचित राहिलेल्या विभागाच्या कल्याणासाठी समर्पिततेने कार्य करीत आहे."

Tweet:

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज चैत्यभूमी येथे जाऊन बाबासाहेबांच्या स्मारकास विनम्र अभिवादन केले.

Tweet:

विषमतेच्या विषवल्लीने ग्रासलेल्या संस्कृतीला समतेची संजीवनी देणारे ; संविधानाचे शिल्पकार; भारताचे भाग्यविधाते; महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना 64 व्या महावरीनिर्वाणदिनी त्यांच्या क्रांतिकारी स्मृतींना विनम्र अभिवादन!

Tweet:

डॉ. बाबासाहेबांनी आपल्याला ‘शिका आणि संघटीत व्हा’ अशी शिकवण दिली. समाजातील प्रत्येक व्यक्तीला मान, सन्मान, न्याय, व्यक्ती-अभिव्यक्ती स्वातंत्र्य, मतदानाचा हक्क व समानतेची वागणूक देणारी राज्यघटना दिली.

Tweet:

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चैत्यभुमी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केले आहे. तसेच आंबेडकर यांच्या जीवनावरील एका पुस्तकाचे प्रकाशन यावेळी करण्यात आले आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्म स्वीकारत अनेकांना या धर्माची दीक्षा दिली. दरम्यान भारतातील अनुसूचित जाती, जमातींच्या लोकांना सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक स्तरावर सक्षम करण्यासाठी डॉ. आंबेडकरांनी भरीव कामगिरी केली आहे.