
Mahakumbh 2025: महाकुंभ मेळा लवकरच संपणार आहे. दरम्यान, प्रयागराजमध्ये पवित्र स्नान करण्यासाठी भाविकांची गर्दी कमी होताना दिसत नाही. मिळालेल्या वृत्तांनुसार, आतापर्यंत 42 कोटींहून अधिक भाविकांनी गंगा नदीत स्नान केला आहे. महाकुंभाचे शेवटचे शाही स्नान महाशिवरात्रीला 26 फेब्रुवारी रोजी होणार असून मेळा व्यवस्थापकांच्या मते, महाकुंभमेळा महाशिवरात्रीनंतर ४ दिवसांपर्यंत सुरू राहील. महाकुंभ 2025 चा पवित्र आध्यात्मिक मेळा १४४ वर्षांनी आला आहे. महाकुंभ दरम्यान त्रिवेणी संगमावर पवित्र नद्यांमध्ये आध्यात्मिक शक्तींचा प्रभाव असतो, या काळात त्रिवेणीत डुबकी मारणाऱ्या व्यक्तीचे सर्व पाप धुऊन जातात आणि त्या व्यक्तीशी संबंधित प्रत्येक दोष दूर होतो आणि व्यक्तीला मोक्ष मिळतो. सनातन धर्मात महाशिवरात्री सणाला आध्यात्मिक महत्त्व आहे. पौराणिक कथेनुसार, या दिवशी भगवान शिव आणि देवी पार्वतीचा विवाह झाला होता. या पवित्र दिवशी त्रिवेणी संगमात स्नान केल्याने आध्यात्मिक ज्ञान, शांती आणि भगवान शिवाचे विशेष आशीर्वाद मिळतात.
26 फेब्रुवारी 2025 रोजी स्नानासाठी शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त: सकाळी 05.00 ते 05.48
अमृत काळ: सकाळी 07.28 ते सकाळी 09.00
अमृत काळ (विस्तारित): सकाळी 06.03 ते सकाळी 07.32 (27 फेब्रुवारी 2025)
महाकुंभ 2025: अमृत स्नानाचे नियम
अमृत स्नानातून जास्तीत जास्त आध्यात्मिक लाभ मिळविण्यासाठी, भक्तांनी शिस्तबद्धपणे या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले पाहिजे. त्रिवेणीत स्नान करण्यापूर्वी, नागा साधू आणि संत त्यांचे स्नान पूर्ण होईपर्यंत वाट पहा. स्नान करतांना आचरण शुद्ध असणे गरजेचे आहे. गरिबांना दान देणे पुण्याचे ठरू शकते. इत्यादी नियम पालन केल्यास या स्नानाचे अधिक लाभ तुम्हाला मिळतील ते नक्की...