प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

Madhya Pradesh: मध्य प्रदेशातील इंदौर येथे एक हैराण करणारा प्रकार समोर आला आहे. येथील एका करोडपतीच्या बायकोने आपल्या पेक्षा 13 वर्षाने लहान असलेल्या रिक्षाचालकासोबत पळ काढला आहे. आरोप असा ही लावला जात आहे की, तिने नवऱ्याच्या घरातून तब्बल 47 लाख रुपयांची रोकड सुद्धा लंपास केली आहे. फ्री प्रेस जनरल यांनी छापलेल्या एका रिपोर्ट्स मध्ये याबद्दल अधिक सांगण्यात आले आहे. नवऱ्याने आपली बायको हरविली असण्यासह घरातून लाखो रुपये चोरी झाल्याची तक्रार दाखल केली आहे.

या प्रकरणी पोलीस तपास करत आहे. करोडपतीची बायको आणि रिक्षाचालकाचा शोध घेतला जात आहे. रिक्षाचालक हा नेहमीच तिला घराजवळ सोडण्यासाठी येत होता. गेल्या 13 ऑक्टोंबर पासून महिला बेपत्ता आहे. पत्नी जेव्हा रात्री पर्यंत घरी आली नाही त्यानंतर नवऱ्याने ती बेपत्ता झाल्याचा रिपोर्ट पोलिसात दाखल केला.(Madhya Pradesh: धक्कादायक! गुगलवर सर्च केला बाळाला मारण्याचा प्लॅन, 3 महिन्याच्या मुलीची आईकडून हत्या)

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेचा नवरा हा कोटी रुपयांच्या संपत्तीचा मालक आहे. त्याने घराच्या कपाटात 47 लाख रुपये ठेवले होते. त्या पैशांसह महिलेने घरातून पळ काढला. पोलिसांच्या मते महिलेसोबत पळून गेलेल्या रिक्षाचालकाचे नाव इमरान असून त्याचे वय 32 वर्ष आहे. पोलिसांनी इमरानच्या एका मित्राच्या घरातून 33 लाख रुपयांची रोकड जप्त केली आहे. पण अद्याप महिला आणि त्याला अटक करण्यात आलेले नाही.पोलिसांकडून विविध ठिकाणी छापेमारी सुद्धा केली जात आहे. तसेच त्या दोघांचे मोबाईल फोन सुद्धा ट्रेस केले जात आहे.