Madhya Pradesh: धक्कादायक! गुगलवर सर्च केला बाळाला मारण्याचा प्लॅन, 3 महिन्याच्या मुलीची आईकडून हत्या
लहान बाळाचा मृत्यू (File Image)

Madhya Pradesh: मध्य प्रदेशातील उज्जैन येथे एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. येथील एका महिलेने आपल्या तीन महिन्याच्या मुलीला पाण्यात बुडून ठार मारले आहे. या प्रकरणी मुलीच्या आईनेच तिच्या हत्येचा कट गुगलवर सर्च केला होता. आता आरोपीला अटक केली आहे. तर मुलीचा मृतदेह हा पाण्याच्या टाकीत मिळाला. आधीपासूनच मुलीची हत्या तिच्या आईने केल्याचा संशय होता आणि तो खरा निघाला.

खाचरौद परिसरातील ही घटना असून महिलेने मुलीची हत्या कशी करायची याबद्दल गुगलवर सर्च केले होते.अखेर मुलीची हत्या महिलेने 12 ऑक्टोंबरला केली. या प्रकरणी पोलिसांनी अधिक तपास केला असता त्यांना महिलेच्या मोबाईलमध्ये मुलीची हत्या करण्यासंबंधित सर्च केल्याचे मिळाले. त्यामुळे पोलिसांनी महिलेला अटक केली. याआधी मुलीची हत्या नवरा, सासू आणि सासरे यांनी केल्याचा संशय व्यक्त केला जात होता.(Uttar Pradesh Crime: उत्तर प्रदेशमध्ये लष्करात भरतीच्या बहाण्याने तरुणांंना फसवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, चंदौली पोलिसांनी केली कारवाई)

खाचरौद स्थित स्टेशन रोड येथे राहणाऱ्या अर्पित याची तीन महिन्याची मुलगी 12 ऑक्टोंबरला बेपत्ता झाली. त्यामुळे अर्पित याने मुलगी हरविल्याची तक्रार पोलिसात केली. पोलिसांनी तपास सुरु केला असता त्यांना मुलीचा मृतदेह तिसऱ्या मजल्यावर असलेल्या पाण्याच्या टाकीत मिळाला. यामध्ये असा खुलासा झाला की, मुलीच्या आईनेच तिची हत्या केली आहे. अर्पित याचे स्वाती (मुलीची आई) हिच्यासोबत 2019 मध्ये फेब्रुवारी महिन्यात लग्न झाले होते.

एएसपी आकाश भूरिया यांनी असे म्हटले की, मुलगी दुपारी घरातून अचानक बेपत्ता झाली. त्यावेळी अर्पित हा घराखाली असलेल्या दुकानात होता. घरात स्वाती आणि तिची सासू यांच्या व्यतिरिक्त कोणीही नव्हते. तपासात असे कळले की, स्वातीने मोबाईलमध्ये 10 ऑक्टोंबरला मुलीला पाण्यात बुडवून कसे ठार मारायचे याबद्दल सर्च केले होते.