Madhya Pradesh Shocker: तोंड दाबून डोळ्यात भरली चटणी, संपत्तीसाठी शेजारणीला मारहाण; पीडितेची प्रकृती गंभीर, रुग्णालयात उपचार सुरु
Man Beats Woman (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Woman Assaulted Guna: मध्य प्रदेश राज्यातील गुन्हा जिल्ह्यात एका पुरुषाने महिलेवर अत्यंत क्रूरपणे हल्ला करण्यात केला आहे. आरोपीने महिलेचे तोंड बांधले (Man Glues Woman Mouth Shut) आणि तिच्या डोळ्यात चटणी (Puts Chilli Powder in Woman Eyes) भरली. अतीव वेदनेने महिला किंचाळत आणि मदतीची याचना करत असतानाच आरोपीने तिला बेदम मारहाण केली. ज्यामध्ये ती गंभीर जखमी झाली. तिच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु असून तिची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. घडल्या प्रकारामुळे परिसरात संतापाचे वातावरण आहे. मालमत्तेच्या वादातून ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे. संपत्तीच्या वदातून इतक्या टोकाला आणि अमानवी पद्धतीने केलेल्या वर्तनामुळे सदर व्यक्तीबद्दल परिसरात संतापाची लाट निर्माण झाली आहे.

पीडितेच्या मालमत्तेवर डोळा

आरोपी आणि पीडित महिला परस्परांचे शेजारी आहेत. पाठिमागील अनेक वर्षांपासून ते शेजारीच राहतात. तसेच, पीडितेचे आरोपीसोबत संबंध असल्याचे समजते. महिलेकडे पीडितेच्या आईची आणि काही वडिलोपार्जित मालमत्ता आहे. या मालमत्तेवर आरोपीचा सुरुवातीपासूनच डोळा होता. ही मालमत्ता आपल्या नावावर हस्तांतरीत करावी यासाठी तो पीडितेच्या पाठिमागे लागला होता. मात्र, अनेक विनंत्या, दबाव टाकूनही पीडितेन त्यास नकार दिला. त्यातून त्यांच्यातील संबंध दुरावले होते. त्यातून त्यांच्या ताणतणावही निर्माण झाला होता. याच कारणावरुन त्यांच्यात किरकोळ भांडणेही होत असत. (हेही वाचा, बायकोने अपहरण करुन नवऱ्याच्या प्रेयसीच्या गुप्तांगात भरली चटणी, बनवला VIDEO)

वेदनेने व्याकूळ पीडितेला बेदम मारहाण

पीडित आणि आरोपी यांच्यात आगोदर असलेल्या भांडणाने ही घटना घडली त्या दिवशी अधिकच व्याप्त स्वरुप घेतले. सुरुवातीला किरकोळ कारणांवरुन सुरु झालेला वाद अगदी टोकाला गेला. रागाच्या भरात बेभान झालेल्या आरोपीने पीडितेचे तोंड दाबले आणि तिच्या डोळ्यात चटणी भरली. डोळ्यात चटणी भरल्यामुळे पीडिता वेदनेने व्याकूळ झाली. ती वेदनेने किंचाळत आणि मदतिची याचना करत असतानाच आरोपीने तीला बेदम मारहाण केली. ज्यामध्ये ती गंभीर जखमी झाली. (हेही वाचा, पुणे: मैत्रिणीला भेटायला गेला, बायको-मुलांनी घरी नेऊन बदडला; नवऱ्याची पोलिसात फिर्याद, पिंपरी चिंचवड येथील घटना)

इंडिया टुडेनेने दिलेल्या वृत्तानुसार, पीडिता आणि आरोपी यांच्यात पाठीमागील दोन वर्षांपासून संबंध होते. अलिकडेच त्यांच्यात दुरावा आला होता. पीडितेच्या आईच्या नावावर वडिलोपार्जीत घर होते. त्यांच्या निधनानंतर या घरावरुन आरोपी आणि पीडिता यांच्यात वाद निर्माण झाला. या वादातूनच आरोपीने अमानवी कृत्य केले. दरम्यान, पीडितेने तातडीने पोलिसांशी संपर्क साधल्याने कारवाई करत पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. घटनास्थळावरुन साक्षी पुरावे जमा करण्याचे काम सुरु आहे. तसाच प्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे. महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर तिचाही जबाब नोंदविण्यात येईल, असे पोलिसांनी म्हटले आहे.