लज्जास्पद! 1000 बहिणींचा भाऊ अशी ओळख असणाऱ्या नगरसेवकाने केला अल्पवयीन मुलीवर बलात्कार, पोलिसांकडे दिली कबुली
Image Used for Representational Image Only | (Photo Credits: Latestly/Illustration)

मध्य प्रदेश: बेतूल (Betul) येथे नगरसेवक राजेंद्र सिंग (Rajendra Singh) उर्फ केंदू बाबा यांच्यातर्फ़े दरवर्षी मोठ्या स्तरावर सामूहिक रक्षाबंधनाचा (Rakshabandhan) सोहळा आयोजित करण्यात येतो, या सोहळ्यात राजेंद्र यांना हजारो महिला राखी बांधतात, परिणामी हजार बहिणींचा भाऊ हीच त्यांची ओळख बनली आहे, मात्र या ख्यातीला काळिमा फासेल अशा प्रकारे या नराधमाने बेतूल मध्ये राहणाऱ्या एका 11 वर्षीय चिमुकलीवर बलात्कार (Rape) केल्याचे सध्या समोर येत आहे. याबाबत राजेंद्र यांने स्वतःच पोलिसांकडे कबुली दिली असल्याने हा कोणताही राजकीय किंवा अन्य कट असेल या शक्यतेला सुद्धा जागा उरली नाहीये.

बेतूल गंज पोलीस स्थानकातील अधिकारी मोतिलाल कुशवाला यांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी पोलीस स्थानकात एका निनावी पत्र आले होते यामध्ये एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार घडल्याच्या घटनेची माहिती दिली होती, यावरूनच हे प्रकरण उघडकीस आले आहे. या पत्रात पीडित मुलीचं नाव आणि पत्ता सुद्धा दिला होता, त्यानुसार पोलिसांनी त्या मुलीच्या घरी जाऊन तिच्या पालकांची भेट घेतली, आरोपी राजेंद्र सिंग याचे नाव गावात प्रसिद्ध असल्याने या मुलीच्या पालकांनी सुरवातीला माहितीची पुष्टी करण्यास नकार दिला मात्र त्यानंतर त्यांनी धीराने ही घटना खरी असल्याचे सांगितले . तसेच राजेंद्र याने या प्रकरणी कुठेही वाच्यता केल्यास कुटुंबाला हानी पोचवण्याची धमकी दिल्याचे देखील मुलीच्या पालकांनी सांगितले. धक्कादायक! मार्कांची स्पर्धा भोवली, चुलत भावाने शिक्षकासोबत मिळून बहिणीवर केला सामूहिक बलात्कार

 

दरम्यान, प्राथमिक तपासात हाती आलेल्या या माहितीनुसार पोलिसांनी रविवारी राजेंद्र सिंग याच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याच्या अटकेचे आदेश दिले होते, या दबावाने घाबरून जाऊन राजेंद्र याने स्वतःहूनच पोलिसांकडे आपण केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. याप्रकरणी ते पत्र कोणी पाठवले होते याचा खुलासा झाला नसला तरी राजेंद्र याला कठोर शिक्षा करणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.