Madhya Pradesh: पत्नीने टॉवेल देण्यास उशीर केल्याने संतापलेल्या पतीने डोक्यात घातले फावडे, मृत्यू
Death (Photo Credits-Facebook)

Madhya Pradesh: मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. येथील एका नवऱ्याने आपल्या पत्नीच्या डोक्यात चक्क फावडा मारत तिला ठार केले आहे. यामागील कारण असे की, तिने नवऱ्याला लगेच टॉवेल दिला नाही. यामुळे संतापलेल्या नवऱ्याने हे कृत्य केल्याने तिचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी म्हटले की, ही घटना किरनापुर ठाणे क्षेत्रातील हीरापुर गावातील आहे.(Delhi Crime: दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने 13 जणांची फसवणूक करणाऱ्या बिल्डरला केली अटक)

किरनापुर पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र कुमार बारिया यांनी म्हटले की, शनिवारी त्यांना या घटनेबद्दल माहिती मिळाली. तेव्हा कळले की, एका नवऱ्याने आपल्याच बायकोची हत्या केली आहे, 50 वर्षीय आरोपी राजकुमार हा वन विभागात नोकरी करतो. मृत महिलेचे नाव पुष्पा बाई असे आहे.(Odisha Murder Case: भुवनेश्वरमध्ये व्यक्तीने पत्नी आणि नऊ वर्षांच्या मुलाची केली हत्या, आरोपीला अटक)

पोलिसांनी असे सांगितले की, जेव्हा राजकुमार याने पुष्पा हिच्याकडे टॉवेल मागितला असता तेव्हा ती किचनमध्ये भांडी घासत होती. त्यामुळे तिने राजकुमार याला थोडा वेळ वाट पाहण्यास सांगितली. परंतु राजकुमार याला ऐवढा राग आला की, त्याने फावड्याने पुष्पा हिच्या डोक्यावर त्याचा आघात केला. यामुळे तिचा जागीच मृ्त्यू झाला. या प्रकारावेळी राजकुमार याच्या मुलीने त्याची अडवणूक करण्याचा प्रयत्न केला. पण त्याने मुलीला सुद्धा बेदम मारहाण केली. तर शनिवारी महिलेचे शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर मृतदेह नातेवाईकांना सोपवण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत राजकुमार याला अटक केली आहे.