Madhya Pradesh Accident: महाराष्ट्रातून मूळ गावी निघालेल्या स्थलांतरीत मजूरांच्या ट्रकचा गुना येथे अपघात; 8 मजूरांचा मृत्यू तर 50 जण जखमी
Madhya pradesh Accident (Photo Credits: ANI)

लॉकडाऊनमुळे महाराष्ट्रातून उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh)  आपल्या घरी निघालेल्या स्थलांतरीत मजूरांच्या ट्रकला अपघात झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. काल (13 मे) रात्री मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) गुना (Guna) येथील कॅन्ट पीएस (Cantt PS) भागात ट्रक आणि बसची धडक झाली. या अपघातात 8 मजूरांचा मृत्यू झाला असून 50 जण जखमी झाले आहेत. या अपघातात 8 मजूरांचा मृत्यू झाला असून तब्बल 50 जण जखमी झाले आहेत. या जखमींना जिल्हा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

उत्तर प्रदेशात देखील एक अपघात झाला असून चालत घरी जाणाऱ्या 6 स्थलांतरीत मजूरांचा यात मृत्यू झाला आहे. हे मजूर मुझफ्फरनगर-सहारनपूर महामार्गावरुन चालत आपल्या घरी जात होते. दरम्यान घौली चेकपोस्ट जवळ भरधाव बसच्या धडकेत त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी बसचालकाविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. (औरंगाबाद: करमाड येथे झालेल्या 16 मजूरांच्या मृत्यूची काळीज पिळवटून टाकणारी घटना सांगतोय प्रत्यक्षदर्शी, नेमके काय घडलं?)

ANI Tweet:

यापूर्वी औरंगाबाद येथे झालेल्या अपघातात 16 स्थलांतरीत मजूरांना आपले प्राण गमवावे लागले होते. चालून थकलेले मजूर रात्रीच्या वेळेस रेल्वेरुळावर विश्रांतीसाठी झोपले होते. त्याचवेळेस वेगात असलेल्या मालगाडीने त्यांना उडवले. याप्रकरणी महाराष्ट्र सरकारने मजूरांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाखांची मदत जाहीर केली आहे.