मराठमोळे लेफ्टनंट जनरल मनोज नरवणे होणार भारतीय लष्कर उपप्रमुख
Lt Gen Manoj Mukund Naravane (Photo Credits : commons.wikimedia)

केंद्र सरकारने जाहीर केलेल्या नव्या नियुक्तींनुसार आता मराठमोळे लेफ्टनंट जनरल मनोज नरवणे (Manoj Naravane )आता भारतीय लष्कराचे नवे उपप्रमुख (Army Vice Chief) असतील. नरवणे हे लेफ्टनंट जनरल डी. अंबू (Lt Gen D Anbu) यांच्यानंतर या पदाचा कारभार सांभाळतील. अंबू हे 31 ऑगस्ट दिवशी निवृत्त होणार आहेत. त्यानंतर मनोज नरवणे यांची नियुक्ती केली जाणार आहे. तसेच ते लष्कर प्रमुख बिपीन रावत ( Bipin Rawat) नंतर ज्येष्ठ अधिकारी असल्याने 31 डिसेंबरला रावत निवृत्त झाल्यानंतर भारताच्या लष्कर प्रमुख पदी देखील मनोज नरवणे यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.

कोण आहेत मनोज मुकुंद नरवणे?

  • लेफ्टनंट जनरल मनोज नरवणे यांचे शालेय शिक्षण पुणे येथील ज्ञानप्रबोधिनी प्रशालेत झाले. त्यांनी पुण्यातील एनडीए आणि डेहराडून येथील सैन्य अकादमी येथे लष्करी शिक्षण घेतले.
  • मनोज नरवणे हे राष्ट्रीय सुरक्षा अकादमी आणि भारतीय सैन्य अकादमीचे माजी विद्यार्थी आहेत.
  • भारतीय लष्कर दलात 1980 साली त्यांनी शीख लाईट इन्फेन्ट्रीच्या 7 व्या बटालियनमधून आपल्या कारकीर्दीची सुरूवात केली आहे.
  • ईशान्य भारत आणि जम्मू-काश्मीरसह श्रीलंकेमध्ये भारतीय शांतता सुरक्षा बलाचे सदस्य म्हणून काम केले आहे.
  • जम्मू-काश्मीरमध्ये राष्ट्रीय रायफल्स बटालियन व ईशान्य भारतामध्ये एका इन्फेन्ट्री ब्रिगेडचं नेतृत्व केलं आहे.'ऑपरेशन ऑल आऊट' या लष्कराच्या मोहिमेत दहशतवाद्याचा खात्मा करण्याचं, त्यांना अटक करण्याचं किंवा घातपातापूर्वी त्यांचा खात्मा करण्यासाठी ही मोहिम महत्त्वाची आहे. भारतीय लष्काराने या मोहिमेअंतर्गत 20 जणांना अटक करून महत्त्वाची कामगिरी पार पाडली. भारतीय लष्करातील अधिकारी आणि जवानांचे युनिफॉर्म बदलणार

    लेफ्टनंट जनरल नरवणे यांना उल्लेखनीय कामगिरीसाठी परमविशिष्ट सेवा मेडल, अतिविशिष्ट सेवा मेडल, सेना मेडल आणि विशिष्ट सेवा मेडलने सन्मानित करण्यात आले आहे