
कधीही कशाचीही अपेक्षा न करता अहोरात्र आपल्या देशाची सेवा करण्यास तत्पर असलेल्या भारतीय लष्करातील (Indian Army) अधिकारी आणि जवानांच्या (Soldier)पोशाखात लवकरच मह्त्वाचे बदल करण्यात येणार आहेत. त्यासंदर्भात भारतीय लष्कराच्या मुख्यालयातून जवावांना 11 विभागांना पत्र पाठविण्यात आले आहेत. भारतीय जवानांचा हा पोशाख खूपच सुंदर आणि आरामदायी असा असणार आहे. ह्या प्रक्रियेस वेळ लागणार असला तरी, लवकरात लवकर हे बदल करण्यात यावेत यासाठी युद्धपातळीवर काम सुरु झाले आहे.
प्रत्येक व्यक्तीच्या पोशाखावरुन त्या व्यक्तीच्या कामाचे क्षेत्र ओळखले जाते. त्यात सर्वात अव्वल स्थानी आहेत ते आपले भारतीय जवान. मात्र आता त्यांच्या ह्या पोशाखात काही महत्त्वाचे बदल करुन त्यांना अतिशय सुंदर आणि आरामदायी असे पोशाख देण्यात येणार आहे. ह्या पोशाखात अन्य देशांप्रमाणे जवानांच्या शर्ट आणि पॅन्टचा रंग वेगवेगळा ठेवण्यात यावा, पोशाखावर लावण्यात येणारे स्टार हे खांद्यावर न लावता ते इतर देशांप्रमाणे छातीवर लावण्यात यावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
तसेच कॉम्बेट पोशाखात वापरण्यात येणारा पट्टा वगळण्यात यावा. जेणेकरुन हा पोशाख अधिकच उत्कृष्ट आणि आरामदायी होतील. त्याचबरोबर पोशाखासाठी वापरण्यात येणा-या कापडासंदर्भात देखील विचार करण्यात यावा, अशी सूचना देण्यात आलीय.
Army Day 2019: 15 जानेवारीला का साजरा केला जातो भारतीय सेना दिवस?
जवानांच्या पोशाखाबाबत अनेकदा सूचना दिल्या जातात. मात्र या प्रक्रियेला बराच वेळ लागू शकतो. याआधी देखील भारतीय जवानांच्या पोशाखात छोटे-मोठे बदल करण्यात आले होते. यात बूटासंदर्भात बदल देखील करण्यात आला होता.