LPG Price Hike: गॅस सिलेंडरचे दर पुन्हा वाढले; जाणून घ्या मुंबई ते कोलकत्ता शहरातील आजपासून चे नवे दर
LPG-Cylinder (फोटो सौजन्य -Wikimedia Commons)

2023 च्या शेवटच्या महिन्याला सुरूवात झाली आहे. आज पहिल्याच तारखेला गॅस सिलेंडर्सच्या किंमतींमध्ये वाढ झाली आहे. एलपीजी सिलेंडर (LPG Cylinder) आजपासून पुन्हा वाढला आहे. ही दरवाढ कमर्शिअल गॅस सिलेंडर्सच्या (Commercial Gas Cylinder) किंमतींमध्ये झाली आहे. तेल कंपन्यांनी एलपीजी गॅस 21 रूपयांनी वाढवला आहे. 19 किलोचा गॅस सिलेंडर आता दिल्लीत 1796.50 रुपये, मुंबई मध्ये 1749.00 रुपये झाला आहे. आजपासून गॅस सिलेंडर्सच्या दरामध्ये ही वाढ करण्यात आली आहे.

मागील महिन्यात ऐन दिवाळीच्या महिन्यामध्ये तेल कंपन्यांनी 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमती 103 रुपयांनी वाढवल्या होत्या. 16 नोव्हेंबरला छठ पुजेच्या निमित्ताने एलपीजी सिलेंडवर दिलासा देण्यात आला होता. सिलेंडरची किंमत 50 रुपयांनी कमी करून 1755.50 रुपये करण्यात आल्या मात्र वर्षाच्या अखेरच्या महिन्यात पुन्हा एकदा एलपीजीच्या व्यावसायिक सिलेंडरचे दर 41 रुपयांनी वाढवले आहेत. नक्की वाचा: Changes from 1st December: HDFC Regalia क्रेडिट कार्ड ते सीम कार्ड बाबत 1 डिसेंबर पासून बदलणार हे नियम .

घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतींमध्ये वाढ नाही

आज तेल कंपन्यांकडून दरवाढ जाहीर झाल्यानंतर व्यावसायिक सिलेंडरच्या किंमती वाढल्या आहे. तेल कंपन्यांनी 14 किलोग्रॅमच्या घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतींमध्ये बदल केलेला नाही. IOCL वेबसाइटनुसार, घरगुती गॅस सिलेंडर दिल्लीत 903 रुपये, कोलकात्यात 929 रुपये, मुंबईत 902.50 रुपये आणि चेन्नईमध्ये 918.50 रुपये किमतीत उपलब्ध आहे. त्यामुळे सध्या सेलिब्रेशनच्या या हंगामामध्ये बाहेरचं खाणं खिशाला चाट पाडणारं ठरू शकतं कारण हॉटेल्स, रेस्टॉरंट मध्ये गॅस सिलेंडर्सचे दर वाढलेले असल्याने किंमतींमध्ये बदल केले जाऊ शकतात.

आजपासून 19 किलोचा व्यावसायिक एलपीजी सिलेंडर दिल्लीमध्ये 1755.50 रुपयांऐवजी 1796.50 रुपयांना मिळणार आहे. कोलकातामध्ये किंमत 1885.50 रुपयांवरून 1908.00 रुपये झाली आहे. मुंबईत व्यावसायिक एलपीजी सिलेंडरची किंमत 1728.00 रुपयांवरुन 1749.00 रुपये झाली आहे. तर चेन्नईमध्ये व्यावसायिक सिलेंडरसाठी 1942.00 रुपयांऐवजी 1968.50 रुपये मोजावे लागणार आहेत.