एलपीदिवसेनदिवस महागाई वाढतचं चाल्ली आहे. जिवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडत आहे. तेल, भाजी, दुध या वस्तूंच्या किमतीत सातत्याने वाढ बघायला मिळते. पण आता एलपीजी सिलेंडर मात्र फक्त ५०० रुपयांत मिळणार असण्याची घोषणा राजस्थान सरकाने केली आहे. महाराष्ट्रातील जनतेला या दर कपातीचा काहीही फायदा होणार नसला तरी महाराष्ट्र सरकार केव्हा एलपीजीचे दर कमी करणार असा सवाल आता नक्कीचं उपस्थित होत आहे. राजस्थान सरकारकडून एलपीजी दर कपातीची मोठी घोषणा करण्यात आली आहे. तरी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमिवर राजस्थान कॉंग्रेस सरकारने हा निर्णय घेतल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. ५०० रुपयांत सिलेंडर हे केवळ दारिद्र्यरेषेखालील म्हणजेच BPL आणि उज्ज्वला योजनेत नाव नोंदवलेल्या नागरिकांना मिळणार असल्याचं राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी सांगितलं आहे.
राजस्थान सरकारच्या या नव्या घोषणे अंतर्गत दारिद्र्यरेषेखालील (BPL) आणि उज्ज्वला योजनेतील नागरिकांना 500 रुपयांमध्ये गॅस सिलेंडर देण्यात येईल. तसेच या योजनेतून BPL धारकांना वर्षाला 12 सिलेंडर म्हणजेचं दर महा एक सिलेंडर या प्रमाणे देण्यात येईल. वर्षाला १२ सिलेंडरपेक्षा अधिक सिलेंडर मिळणार नाही असेही गेहलोत सरकारकडून स्पष्ट करण्यात आले. सध्या राजस्थानात एलपीजी सिलेंडरची किंमत १ हजार ४० रुपये आहे पण राजस्थान सरकराच्या या निर्णयानंतर राज्यातील दारिद्रयरेषेखालील जनतेला हे सिलेंडर अर्ध्या किमतीहून ही अधिक स्वस्त दरात मिळणार आहे. (हे ही वाचा:- LPG Subsidy पुन्हा खात्यामध्ये जमा होण्यास सुरू; पहा ऑनलाईन कसं तपासाल त्याचं स्टेट्स)
राजस्थान में BPL और उज्ज्वला योजना के अंतर्गत आने वाले लोगों को 1 अप्रैल से '500 रुपए' में मिलेगा रसोई गैस सिलेंडर।
मुख्यमंत्री, श्री @ashokgehlot51 की बड़ी घोषणा।#AlwarBoleBharatJodo pic.twitter.com/aD56DWwxo1
— Congress (@INCIndia) December 19, 2022
एलपीजी सिलेंडरचे नवे दर येत्या आर्थिक वर्षापासून म्हणजेचं १ एप्रिल २०२३ पासून लागू होणार आहे. वार्षिक १२ सिंलेडरच्या योजने सोबतच राजस्थानातील नागरिकांना सिलेंडरसह 'रसोई किट'मध्ये स्वयंपाकघरातील सामानही देण्यात येणार असल्याची मोठी घोषणा मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केली आहे. तरी कॉग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सध्या राजस्थानात आहे. राजस्थान सरकारच्या निर्णयानंतर राहुल यांच्या पदयात्रेस चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. तरी आता महाराष्ट्रात एलपीजी सिलेंडरचे दर कधी कमी होणार अशी प्रतिक्षा महाराष्ट्रातील जनतेला लागली आहे.