प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credit : Youtube)

Loksabha MP's Salary Reduced: लोकसभा खासदारांंच्या वेतनात 30% कपात करण्याच्या विधेयकाला आज संसदेत पावसाळी अधिवेशनाच्या (Monsoon Session) दरम्यान मंंजुरी देण्यात आली आहे. या कपात केलेल्या रक्कमेचा वापर देशातील कोरोना संंकटात विविध उपाययोजना करण्यासाठी केला जाईल असे सांंगण्यात आले आहे. संसद सदस्यांचे वेतन, भत्ते आणि निवृत्तीवेतन (दुरुस्ती) विधेयक 2020 हे आज लोकसभेत मांंडण्यात आले होते ज्यास बहुमताने मंंजुरी देण्यात आली. हा अध्यादेश एप्रिल 6 रोजी मंत्रिमंडळाने मंजूर केला होता जो आज पावसाळी अधिवेशनाच्या दुसर्‍या दिवशी मांंडण्यात आला आहे. दुसरीकडे या विधेयकाला विरोधी पक्ष खासदारांंनी सुद्धा विना आक्षेप मंजुर केले. एकवेळ 30% नाही तर पुर्ण वेतन कापावं मात्र सरकारने MPLAD मध्ये कपात करु नये असेही सर्वांनी सुचित केले होते. Navneet Rana On MPLADS Funds: आमचे वेतन घ्या परंतु, खासदार निधी कापू नका; नवनीत राणा यांची लोकसभेत मागणी

सांसदीय कामकाज मंंत्री प्रल्हाद जोशी यांंनी चर्चेदरम्यान दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाची परिस्थिती पाहता वैद्यकीय कार्यासाठीचा निधी वाढवण्यात येतोय या निधीच्या उभारणीसाठी आपण उचललेल्या अनेक पावलांंपैकी खासदारांंची वेतन कपात ही एक स्टेप आहे. परोपकाराची सुरुवात घरुन करायची असते म्हणुनच लोकप्रतिनिधींंचे हे योगदान महत्वाचे असणार आहे असेही जोशी यांंनी म्हंंटले आहे.

दरम्यान, कोरोनाशी लढण्यासाठी सरकारने 20 लाख कोटींंचे पॅकेज सुद्धा घोषित केलेले आहे. याशिवाय 1. 76 लाख कोटी रुपयांंची गरीब कल्याण योजना जाहीर केली आहे. मनरेगा अंंतर्गत वेतन वाढ केली आहे. एमपीएलएडीएस संदर्भात जे काही निर्णय घेण्यात आले आहेत, ते दोन वर्षांसाठी तात्पुरते आहेत त्यामुळे सर्वांंनी यास पाठिंंबा दर्शवल्यास काम एकमताने होईल, असेही जोशी यांंनी आपल्या भाषणात सांंगितले आहे.