नरेंद्र मोदी (Image: PTI/File)

यंदाच्या लोकसभा निवडणूकीत (Lok Sabha Elections) एकट्या भाजप (BJP) पक्षाने स्पष्ट बहुमताने 300 चा आकडा पार करत विजय मिळवला आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचा हा ऐतिहासिक विजय असल्याचे म्हटले जात आहे. याच पार्श्वभुमीवर बिहार मधील एका तरुणाने भाजप पक्षाचा विजय झाल्याच्या आनंदात आपल्या छातीवर चाकूने 'मोदी' असे नाव कोरले आहे.

सोनू पटेल असे या तरुणाचे नाव आहे. सोनू हा मोदी यांचा जब्बर फॅन असून त्यांच्या विजयाचा आनंद त्याला खुप झाला आहे. प्रसारमाध्यमातील वृत्तानुसार, सोनू ह्याने मोदी यांचे नाव छातीवर चाकूने कोरले म्हणून ते पाहण्यासाठी अनेकांची गर्दी झाली होती. त्यावेळी सोनूने बघ्यांना मिठाईसुद्धा वाटली.(लखनौ: लोकसभा निवडणुकीच्या निकालावेळी झाला मुलगा, मुस्लिम परिवाराने नाव ठवले नरेंद्र मोदी)

एवढच नाही तर आनंद जल्लोषात साजरा करण्यासाठी सर्व वेदना विसरुन जात त्याने हसतहसत आपल्या छातीवर चाकूने मोदी हे नाव कोरले. तसेच मोदी हे भावी देशाचे भविष्य असून त्यांच्यासाठी बलिदान देण्यासाठी तयार आहे असे सुद्धा सोनू ह्याने म्हटले आहे.