लखनौ मधील गोंडा या ठिकाणी लोकसभा निवडणुक 2019 चे निकाल 23 मे रोजी जाहीर करण्यात आले. त्यावेळी एका मुस्लिम घरातील महिलेला निकालाच्याच दिवशी मुलगा झाला. या मुलाचे नाव मुस्लिम परिवाराने नरेंद्र मोदी असे ठेवले आहे.
मैनाज बेगम यांचे असे म्हणणे आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विजयाचा आनंद आणि निकालाच्या दिवशी मुलगा झाल्याने त्यांनी हे नाव ठेवले आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी देशात उत्तम कामगिरी करत असल्याचे बेगम यांनी म्हटले आहे. तसेच मुस्लिम समाजात तिहेरी तलाकाबद्दल मोदी यांनी लागू केलेल्या कायद्याबद्दल मी त्यांचे आभार मानत आहे.(जालंदर: कुटुंबीयांनी मतं दिली नाहीत म्हणून उमेदवार रडला ढसाढसा व्हिडिओ)
घरात जन्मलेल्या नवजात बालकाचे नाव नरेंद्र दामोदर मोदी असावे असा हट्ट मैनाज बेगम यांनी केला. परंतु यासाठी आधी सासरची मंडळी मोदी हे नाव नको असे म्हणून नकारात होते.परंतु शेवटी सासरच्या मंडळींनी आणि नवऱ्याने दुबईतून कामापासून सुट्टी काढत नवजात बालकाचे नाव मोदी ठेवले आहे.