Rahul Gandhi and Priyanka Gandhi (Photo Credits: Twitter)

Lok Sabha Elections 2019: देशभरात आज सहाव्या टप्प्यातील मतदानाला सुरूवात झाली आहे. 17 व्या लोकसभेसाठी (Lok Sabha Elections) सुरू असलेल्या मतदानाच्या आजाच्या सहाव्या टप्प्यामध्ये देशात 59 जागांवर मतदान सुरू आहे. अनेक दिग्गजांमध्ये आज सोनिया गांधी, राहुल गांधी (Rahul Gandhi), प्रियंका गांधी (Priyanka Gandhi Vadra ), रॉबर्ट वड्रा यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. Lok Sabha Elections 2019 Phase 6: राष्ट्रपती रामनाथ कोविंद, राहुल गांधी यांच्यासह अनेक दिग्गजांनी आज दिल्ली मध्ये बजावला मतदानाचा हक्क

राहुल गांधी

आज सकाळी राहुल गांधी यांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर मीडीयाशी बोलताना यंदा निवडनूकीमध्ये बेरोजगारी, शेतकर्‍यांची बिकट अवस्था यासोबत नोटाबंदी, करप्रणाली यावरून सरकारला लक्ष्य केलं आहे. नरेंद्र मोदी निवडणूक प्रचारामध्ये द्वेष आणत आहेत. पण आम्ही प्रेम पुढे करत आहोत आणि प्रेमच जिंकेल असा आशावाद राहुल गांधी यांनी व्यक्त केला आहे.

प्रियंका गांधी

प्रियंका गांधी यांनीदेखील पती रॉबर्ट वड्रा यांच्यासोबत मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर मीडियाशी बोलताना यंदाची निवडणूक लोकशाही आणि भारत देश वाचवण्यासाठी आहे. आमचा हा लढा ज्या गोष्टीसाठी आहे ते लक्षात ठेवून आम्ही मतदान केल्याचं प्रियंका गांधी म्हणाल्या आहेत.

11 एप्रिल ते 19 मे दरम्यान सात टप्प्यात देशातील विविध मतदारसंघांमध्ये लोकसभा निवडणूक 2019 साठी मतदान पार पडणार आहे. पश्चिम बंगाल, झारखंड,मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश,बिहार आणि हरियाणा या राज्यांमध्ये मतदारांमध्येही उत्साह आहे. आज रविवारी नागरिक घराबाहेर पडून मतदान करत आहेत.