Lok Sabha Elections Voting (Photo Credits: Twitter)

Lok Sabha Elections 2019: पश्चिम बंगाल, झारखंड,मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश,बिहार आणि हरियाणा या राज्यांमध्ये आज मतदानाला सुरूवात झाली आहे. सहाव्या टप्प्यातील मतदानामध्ये आज 59 जागांवर मतदान होणार आहे. दिल्लीमध्ये आज राहुल गांधी (Rahul Gandhi), अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal), सुषमा स्वराज (Sushma Swaraj), दिल्लीच्या माजी मुख्यनंत्री शीला दीक्षित( Sheila Dikshit) यांच्यासह देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Ramnath Kovind) यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. सकाळी सात वाजल्यापासूनच मतदारांनी मतदारकेंद्रा बाहेर गर्दी केली आहे. मतदान कसे करावे #भारत Google Doodle: 6 व्या टप्प्यातील लोकसभा निवडणूक मतदानासाठी गुगलचं खास डूडल

राहुल गांधी

रामनाथ कोविंद

शीला दीक्षित

सुषमा स्वराज

अरविंद केजरीवाल

19 मे दिवशी मतदानाचा शेवटचा टप्पा पार पडेल. त्यानंतर 23 मेला मतमोजणी होणार आहे.