मतदान कसे करावे #भारत Google Doodle: 6 व्या टप्प्यातील लोकसभा निवडणूक मतदानासाठी गुगलचं खास डूडल
How To Vote #India (Photo Credits- Google)

How To Vote #India Google Doodle: 12 मे दिवशी भारतामध्ये 17व्या लोकसभेसाठी मतदाना सातवा टप्पा पार पडणार आहे. या दिवसाचं औचित्य साधत गूगलनेही चं खास गूगल डूडल बनवलं आहे. यामध्ये मतदान कसं करावं याची प्रक्रिया माहितीच्या आधारे सांगण्यात आली आहे.  मतदान केल्यानंतर शाई लावलेले बोट दाखवून मतदानाची संपूर्ण प्रक्रीया समजावून सांगण्यात आली आहे.11 एप्रिल ते 19 मे दरम्यान सात टप्प्यात देशातील विविध मतदारसंघांमध्ये लोकसभा निवडणूक 2019 साठी मतदान पार पडणार आहे. आज (12 मे) दिवशी 59 मतदारसंघांमध्ये मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे.पश्चिम बंगाल, झारखंड,मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश,बिहार आणि हरियाणा या राज्यांमध्ये आज मतदान पार पडेल. Lok Sabha Elections 2019: रमजान वेळी मतदानाची वेळ बदलण्यात येणार नाही - निवडणुक आयोग

 कसं कराल लोकसभा निवडणूक 2019 मतदान?

  • 18 वर्षावरील सज्ञान नागरिक त्याच्या ओळखपत्रासोबत मतदान करू शकतो.
  • मतदान करण्याची अनुमती केवळ ज्याचं नाव अधिकृत मतदान यादीमध्ये आहे त्यांनाच मिळू शकतो.
  • मतदार यादीमध्ये नाव पाहिल्यानंतर तुमचं ओळखपत्र पाहिलं जाईल. तुम्हांला निवडणूक आयोगाच्या रजिस्टरवर स्वाक्षरी / अंगठा द्यावा लागतो.त्यानंतर तुमच्या बोटावर शाई लावली जाईल.
  • पुढे ईव्हीएम मशीनवर तुम्हांला ज्यांना मतदान करायचं आहे त्याच्या नाव आणि चिन्हासमोरील बटण दाबून मत रजिस्टर करता येऊ शकतं.
  • तुम्ही ज्याला मतदान केलं आहे त्याच्यासमोर लाल रंगाचा बटण काही काळ ऑन दिसेल.
  • यंदा ईव्हीएम सोबत व्हीव्हीपॅट मशीनदेखील असतील. त्यामध्ये तुम्ही दिलेले मत योग्य उमेदवाराला किंवा नोटाला दिले आहे की नाही याची तुम्हांला माहिती स्क्रीनवर आणि एका स्लिपच्या माध्यमातून मिळेल.

गुगल नेहमीच सणवार, उत्सव, थोरामोठ्यांची जयंती-पुण्यतिथी निमित्त डुडल साकारत असतो. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या 5 टप्प्यातील मतदानादिवशीही गुगलने डुडल साकारले होते. आता पुन्हा  6 व्या टप्प्यातील मतदानाचा उत्साह डुडलवर दिसून येत आहे.