Election Commission (Photo Credits-Twitter)

Lok Sabha Elections 2019: लोकसभा निवडणुकीसाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. या पार्श्वभुमीवर पहिल्या टप्प्यातील निवडणुकीपूर्वी निवडणुक आयोगाने (Election Commission) मोठी कारवाई करत जवळजवळ 377.511 करोड रुपयांची रोकड,157 करोड रुपयांची दारु आणि 705 करोड रुपयांच्या अंमली पदार्थांवर जप्ती आणली आहे.

आचार संहिता लागू झाल्यानंतर ही आकडेवारीत वाढ होऊन आता पर्यंतच्या आकडेवारी नुसार निवडणुक आयोगाकडून कारवाई करण्यात आली आहे. त्यामध्ये देशातील प्रत्येक राज्यातून पैसे, दारु आणि अ्ंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. तसेच या सर्व गोष्टी एका जागेवरुन दुसऱ्या जागेवर घेऊन जाणार असल्याचे समोर आले आहे.(हेही वाचा-Lok Sabha Elections 2019: अरुणाचल प्रदेश येथे जनेतला पैसे देऊन भाजपचा मत विकत घेण्याचा प्रयत्न, काँग्रेस पक्षाचा आरोप)

ANI ट्वीट:

तत्पूर्वी देशात आगामी लोकसभा निवडणुक सात टप्प्यात होणार आहे. तर पहिल्या टप्प्यातील मतदान हे 11 एप्रिल रोजी होणार आहे. तसेच गाझियाबाद येथून सुद्धा निवडणुक आयोगाने मोठी कारवाई करच 120 किलो सोने जप्त केले असून त्याची किंमत जवळजवळ 38 करोड रुपये होती.