Lok Sabha Elections 2019: पटना येथे काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात कार्यकर्त्यांची हाणामारी, पाहा व्हिडिओ
काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांची हाणामारी (Photo Credits-ANI)

Lok Sabha Elections 2019: उत्तर प्रदेश (Utter Pradesh) येथून खासदार निखिल कुमार (Nikhil kUmar) यांना उमेदवारी न देण्यात आल्याने नाराजी व्यक्त करत असलेल्या त्यांच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस (Congress) पक्षाच्या कार्यालयात हाणामारी केली. या हाणामारीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

निखिल कुमार यांना 2004 मध्ये औरंबाद येथील जागेवर विजय मिळवला होता. तर 2014 रोजी लोकसभा निवडणुकीत पुन्हा औरंगबाद येथून उमेदवारी देण्यात आल्यानंतर त्यांना पराभव स्विकारावा लागला होता. बिहार येथे महागठबंधनात सहभागी झालेल्या पक्षांमधील जागा वाटपानंतर औरंगाबाद येथील जागा हिंदुस्थानी आवाम मोर्चा (HAM) यांना देण्यात आली आहे. या संघटनेने औरंगाबाद येथून उपेंद्र प्रसाद यांना आगामी लोकसभा निवडणुकीसाठी तिकिट जाहीर केले आहे.(हेही वाचा-Lok Sabha Elections 2019: काँग्रेस कडून निवडणुकीसाठी 12 वी उमेदवार यादी जाहीर, छिंदवाडा येथून कमलनाथ यांचा मुलगा नकुल नाथ ह्याला तिकिट)

बिहारमध्ये एकूण 40 जागांवर सात टप्प्यात मतदान होणार आहे. येथे अनुक्रमे 11 एप्रिल, 18 एप्रिल, 23 एप्रिल, 19 एप्रिल, 6 मे आणि 19 मे रोजी मतदान होणार आहे. तर पहिल्या टप्प्यातील मतदान 11 एप्रिल रोजी होणार असून औरंगाबादसह जुमई, गया आणि नवादा येथील जागांवर मतदान होणार आहे.