Lok Sabha Elections 2019: काँग्रेस कडून निवडणुकीसाठी 12 जणांची उमेदवार यादी जाहीर, छिंदवाडा येथून कमलनाथ यांचा मुलगा नकुल नाथ ह्याला तिकिट
मुख्यमंत्री कमलनाथ (फोटो सौजन्य-ANI)

Lok Sabha Elections 2019: लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस (Congress) पक्षाने त्यांची 12 वी उमेदवारी यादी जाहीर केली आहे.परंतु काँग्रेसच्या दोन यादी असणार आहेत. या मध्ये 12 जागांसाठी उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. तर पहिल्या यादीमध्ये काँग्रेसने 9 उमेदवारांच्या नावाची घोषणा यापूर्वी केली आहे. तर आता एकूण 21 उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.

काँग्रेस पक्षाने छिंदवाडा (Chhindwara) येथून कमलनाथ (Kamal Nath) यांचा मुलगा नकुल नाथ (Nakul Nath) ह्याला तिकिट जाहीर केले आहे.(हेही वाचा-एकाच महिलेला दोन पक्षांकडून तिकीट; काँग्रेस, प्रसपा उमेदवार यादीत झळकले नाव; घटनात्मक पेच पाहून राष्ट्रीय पक्षाची माघार)

उमेदवारी यादी:

सागर- प्रभुसिंह ठाकुर

दामोह-प्रताप सिंह लोधी,

सतना- राजा राम त्रिपाठी

रेवा- सिद्धार्थ तिवारी

सीधी- अजय सिंह राहुल

जबलपुर- विवेक तन्खा

मंडला- कमल मरावी

छिंदवाडा- नकुल नाथ

देवास- पहलाद टिपानिया

उज्जैन- बाबूलाल

खारगाव- गोविंद मुझ्झालदा

खांडवा-अरुण यादव

अद्याप इंदौर, गुना आणि ग्वालियर सारख्या बड्या मतदारसंघासाठी काँग्रेस पक्षाने उमेदवारी जाहीर केली नाही. तसेच भाजपकडून ही या जागांवर त्यांच्या उमेदवारांची नावे घोषित केली नाही आहेत.