साध्वी प्रज्ञा यांच्या उमेदवारीला आव्हान देणारी याचिका NIA न्यायालयाने फेटाळली
साध्वी प्रज्ञा ठाकुर (Photo Credits- IANS)

साध्वी प्रज्ञा ठाकुर (Pragya Singh Thakur) यांना एनआयए न्यायालयाने (NIA Court) मोठा दिलासा दिला आहे. मुंबईच्या एनआयए कोर्टाने मालेगाव बॉम्ब स्फोट प्रकरणी आरोपी साध्वी प्रज्ञा ठाकुर यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेली याचिका फेटाळली आहे. कोर्टाने सुनावणी दरम्यान असे सांगितले आहे की, आमच्याकडे कोणत्याही उमेदवाराने निवडणुक लढवण्याच्या अधिकारावर बंदी घालावी असा अधिकार नसल्याचे म्हटले आहे. परंतु ह्याचा निर्णय निवडणुक आयोग करण्याची शक्यता असल्याचे सुद्धा सांगण्यात आले आहे. मालेगाव बॉम्ब स्फोट प्रकरणी कोर्टात एका पीडितेच्या वडिलांनी साध्वी यांच्या विरोधात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यामध्ये साध्वी यांना निवडणुक लढवण्यासाठी परवानगी देऊ नये असे सांगण्यात आले होते.

बॉम्ब स्फोटप्रकरणी आपल्या मुलाला गमावलेल्या निसार सईद नावाच्या व्यक्तिने कोर्टात साध्वी यांच्या विरोधात याचिका दाखल केली होती. तसेच मुंबईच्या कोर्टातील कारवाईत साध्वी यांनी उपस्थित रहावे त्याचसोबत निवडणुक लढवण्यावर बंदी घालावी अशी मागणी करण्यात आली होती. उत्तर महाराष्ट्रात मालेगाव शहरात सप्टेंबर 2008 मध्ये स्फोट घडवून आणला होता. त्यामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला होता. तर शंभरपेक्षा अधिक जण गंभीर जखमी झाले होते.(Lok Sabha Elections 2019: माजी एटीएस चीफ हेमंत करकरे यांच्यावरील वादग्रस्त विधानावरून साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांनी निवडणूक आयोगाची कारणे दाखवा नोटीस)

मध्यप्रदेशातील भोपाळ राजकीय क्षेत्रातील भाजप उमेदवार साध्वी प्रज्ञा यांनी बाबरी यांनी बाबरी मस्जिदीचा ठाचा पाडला असल्याचे वादग्रस्त विधान केले होते. त्यामुळे आचार संहितेचे उल्लंघन झाल्याचे सांगत खटला दाखल केला होता.