Coronavirus Lock Down: लॉक डाऊन लक्षात घेता सरकारने तीन महिन्यांचे वीज बिल माफ करावे - रामदास आठवले
Ramdas Athawale | (Photo Credits-Facebook)

लॉक डाऊनमुळे (Lock Down) सर्व गोर गरिबांचे तीन महिन्यांचे लाईटबील शासनाने माफ करावे. किंवा अगदीच सर्व बिल माफ करता येत नसेल तर किमान 50 टक्के वीजबिलाची रक्कम माफ करावी अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी केली आहे. 50 टक्के वीजबिल माफ करण्यासाठी त्यातील अर्धी वीज बिलाची रक्कम म्हणजे 25 टक्के बिल वीज कंपनी ने माफ करावे तसेच पुढील 4 महिने थकबाकीमुळे कोणाचाही विजमिटर कापू नये अशी सूचना आठवले यांनी वीज कंपनी संस्थांना केली आहे. रामदास आठवले यांनी हात जोडून केली देशवासीयांना 'ही' विनंती; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ट्विट केली नवी कविता (Watch Video)

प्राप्त माहितीनुसार, मुंबई उपनगर मध्ये अदानी इलेक्ट्रिसिटी कंपनीतर्फे 18 टक्के वीजबिल माफ करण्यात आले आहे, मात्र यात आणखीन कपात करता येईल का हे तपासण्याची विनंती आपण त्यांना केली आहे, असे आठवले यांनी माध्यमांना सांगितले तर मुंबई शहरात वीज पुरवठा बेस्ट करीत असून मुंबई महापालिकेने स्थायी समिती मध्ये याबाबत ठराव करून 3 महिने वीजबिल किमान 50 टक्के माफ करण्यासाठी निर्णय घ्यावा अशीही विनंती वजा सूचना आठवले यांनी केली आहे. ( हेही वाचा, Coronavirus च्या पार्श्वभूमीवर वीज ग्राहकांना पाठवणार सरासरी बिल; ऊर्जामंत्री नितीन राऊत यांची मोठी घोषणा  )

रामदास आठवले ट्विट

दरम्यान, वीजबिल माफ करण्यासोबत कोरोनाची चाचणी मोफत किंवा अल्प दरात करण्यात यावी अशीही मागणी आठवले यांनी केली आहे. सध्या कोरोना चाचणी साठी 5 हजारापर्यंत दर आकारले जात आहेत. मात्र साहजिकच हे दर गरिबांना परवडणारे नाहीत त्यामुळे ही चाचणी मोफत किंवा रु.500 इतक्या अल्पदरात केली जावी, असे आठवले यांनी म्हंटले आहे, आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार आहोत असेही आठवले यांनी सांगितले. रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते विविध ठिकाणी मदत करीत आहेत त्यांना सहकार्य करावे असे आवाहन केले आहे.