भारतीय सैन्याचे (Indian Army) लेफ्टनंट जनरल (Lieutenant General) अनिल पुरी (Anil Puri) यांनी सातासमुद्रापार आपल्या नवी एक मोठा विक्रम रचला आहे. पुरी यांनी वयाच्या 56 व्या वर्षी फ्रान्स (France) मधील सर्वात जुनी आणि प्रसिद्ध अशी पॅरिस- ब्रेस्ट- पॅरिस सायकलिंग स्पर्धा 23 ऑगस्ट रोजी पूर्ण केली. विशेष म्हणजे यामध्ये त्यांनी विनाआराम सलग 90 तास सायकलिंग करत 1200 किमी अंतराची ही स्पर्धा पूर्ण केली आहे. तसेच निवृत्तीपूर्व काळात सेवेत रुजू असताना अशा प्रकारचा विक्रम करणारे भारतीय सैन्यातील ते पहिले अधिकारी ठरले आहेत. यानंतर अनेक ठिकाणहून अनिल यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. काँग्रेसचे नेते व राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांनी देखील एक खास ट्विट करून अनिल यांचे अभिनंदन केले.
अशोक गेहलोत ट्विट
Congratulations to Lieutenant General Anil Puri for becoming first serving general of the Indian Army to complete France's oldest cycling event, 1,200-km Paris-Brest-Paris circuit, by cycling for 90 hours, without sleep. It is truly remarkable! pic.twitter.com/kSbNmsuEQ0
— Ashok Gehlot (@ashokgehlot51) August 25, 2019
दरम्यान, या स्पर्धेची सुरुवात 1931 मध्ये फ्रान्समध्ये झाली होती. दर चार वर्षातून एकदा पार पडणाऱ्या या स्पर्धेत हजारोंच्या संख्येत उत्साही सायकलस्वार सहभाग घेतात. यंदा यातील 31,125 जणांना ही स्पर्धा पूर्ण करता आली. अनिल पुरी यांच्या सह मैसूर मधील महेश चौधरी या तरुणाने देखील ही स्पर्धा पूर्ण केली आहे. भारतातून यंदा 180 हुन अधिक जणांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता.