PV Sindhu (File Photo)

भारताची बॅडमिंटनची परी पीव्ही सिंधू (PV Sindhu) हिने चीनच्या चेन युफेई (Chen Yufei) हिच्यावर सहज विजय मिळवत जागतिक बॅडमिंटन स्पर्धेची फायनल फेरी गाठली आहे. 21-7, 21-14 असा सामना खेळताना सिंधूने हे कामगिरी केली. 2017 आणि 2018 मध्ये सिंधूने या स्पर्धेत रौप्यपदक जिंकले आणि यावेळी सिंधूचे लक्ष सुवर्ण कामगिरी करण्यावर आहे. 5 वेळा जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत पदक मिळवणारी सिंधू ही जगातील पहिली महिला  खेळाडू आहे. 40 मिनिटे चाललेल्या सामन्यात पीव्ही सिंधूने 21-7, 21-14 असा विजय मिळविला. दुसर्‍या खेळाच्या सुरूवातीस, दोन्ही खेळाडू नेटजवळ खेळण्याचा प्रयत्न करीत आहेत आणि दोघांमध्ये मोठ्या रॅली पाहायला मिळाल्या. सिंधूने ब्रेकपर्यंत 11-7 अशी आघाडी मिळविली. चीनच्या खेळाडूने गेममध्ये परतण्याचा प्रयत्न केला परंतु ती अयशस्वी राहिली. (#FeelingCheated! सायना नेहवाल, पारुपल्ली कश्यप यांनी वर्ल्ड चॅम्पियनशिपमधील पराभवानंतर खराब अम्पायरिंगवर ट्विटरवरून व्यक्त केला संताप)

पहिल्या गेममध्ये सिंधूने लवकर आघाडी मिळवत चीनच्या खेळाडूला दडपणाखाली आणले. दबावात आल्यानंतर चेनने चुका करण्यास सुरवात केली, त्याचा फायदा सिंधूला झाला आणि ब्रेकपर्यंत तिने 11-3 अशी आघाडी मिळवली. ब्रेकनंतर चेनने क्रॉस कोर्ट खेळल्यास सुरुवात केली आणि गुण मिळवले पण आघाडी कमी करण्यात तिला अपयश आले. दुसरीकडे, सिंधूने पहिला गेम मजबूत फटकेबाजी आणि चांगल्या कोर्टाच्या कव्हरेजने जिंकला. सिंधूने वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहचली आहे. आणि आता तिचे लक्ष्य सुवर्ण पदक जिंकण्यावर असेल.

सिंधूने सलग तिसऱ्यानंद या चॅम्पियनशिपची अंतिम फेरी गाठली आहे, परंतु आतापर्यंत ती एकदाही जिंकण्यात अपयशी ठरली आहे. मागील वर्षी अंतिम सामन्यात तिला स्पेनच्या कॅरोलिना मारिन हिच्याकडून पराभवाला सामोरे जावे लागले होते तर, 2017 मध्ये जपानच्या नोजोमी ओकुहारा (Nozomi Okuhara) ने तिचा पराभव केला होता. यावर्षी फायनलमध्ये तिचा सामना ओकुहारा आणि थायलंडच्या रॅचनोक इन्टॅनन (Ratchanok Intanon) यांच्यातील दुसर्‍या सेमीफायनल सामन्यातील विजेत्याशी होईल.