LIC | (File Photo)

भारतातील सर्वात मोठी वीमा कंपनी भारतीय जीवन विमा निगम अर्थातच एलआयसी (LIC) आपला इनिशियल पब्लिक ऑफरिंग म्हणेच आईपीओ (IPO) येत्या 4 मे रोजी बाजारात आणत आहे. हा इश्यू 9 मे 2022 पर्यंत नोंदणीसाठी खुला राहील. अँकर गुंतवणुकदारांसाठी (anchor investors) हा मेगा आयपीओ 2 मे पर्यंत खुला असेन. या आयपीओचीबँड प्राईज रुपये 902-949 प्रति स्टॉक असू शकते. सध्यास्थिती पाहता आयपीओची किंमत घटविण्यात आली आहे. यात रुपये 902-949 प्रति स्टॉक इतकी करण्यात आली आहे.

प्रत्येक लॉट साईज ही 15 असेल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एलआयसी आपल्या पॉलिसीधारकांसाठी 60 रुपयांची सवलतही देईल. तर किरकोळ गुंतवणूकदार (Retail investors) 40 रुपयांची सवलत मिळवू शकतात. वृत्तसंस्था आयएनएसने दिलेल्या माहितीनुसार, एलआयसी आयपीओच्या मध्यमातून सरकार सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीमध्ये आपली 3.5% भागीदारी विक्री करेन. सरकारला यातून 21,000कोटी रुपये मिळतील. सरकारने फेब्रुवारीमध्ये एलआयसीमध्ये पाच टक्क्यांची भागिदारी 31.06 कोटी समभाग विकण्याची योजना बनवली होती. या बाबतीत विनिमय बोर्ड म्हणजेच सेबीकडे (SEBI) आवश्क कागदपत्रे जमा केली आहेत. (हेही वाचा, LIC IPO: एलआयसी आयपीओ घ्यायचा विचार करताय? ही माहिती आपल्यासाठी ठरु शकते फायदेशीर)

दरम्यान, रशिया-युक्रेन युद्धामुळे बाजारात आलेल्या चढ-उतारामुळे आयपीओला काहीसा धक्का बसला. पाठिमागील आठवड्यात सरकारने निर्गमन आकार पाच टक्क्यांनी कमी करुन तो 3.5% करण्याचा निर्णय घेतला आहे.