पश्चिम बंगाल (West Bengal) राज्यातील मालदा जिल्ह्यातून (Malda District) धक्कादायक वृत्त आहे. इयत्ता 12वीमध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थीनीने आत्महत्या (Suicide) केली आहे. वर्गमैत्रिण असलेल्या समलैंगिक (Same-Sex Partner) जोडीदारपासून विभग्त झाल्यानंतर तिने आत्महत्या केली आहे. समलिंगी (Lesbian Friendship) नात्याला दोघींच्याही कुटुंबातून मान्यता मिळणार नाही. या कारणावरुन दोघी एकमेकांपासून विभक्त झाल्या. त्यातून एकीने हे टोकाचे पाऊल उचलले.
मुलीचा मृतदेह तिच्या वडीलांना लटकलेल्या अवस्थेत 1 डिसेंबर रोजी आढळून आला. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या तपासावेळी आत्महत्या केलेल्या मुलीच्या वडिलांनी तिच्या मैत्रीनिकडे अंगुलीनिर्देश करत तिला जबाबदार धरले होते. पोलिसानी सर्व बाजूंचा विचार करुन तपास सुरु केला. पोलिसांना तपासादरम्यान, आत्महत्या केलेली मुलगी आणि तिच्या मैत्रिणीत झालेला फोन संवाद, चॅट्स, सोशल मीडिया पोल्ट आणि इतर बरिच सामग्री हातील लागली. या सामग्रीतून दोघींमध्ये कमालीचे जिव्हाळ्याचे आणि समलिंगी संबंध असल्याची माहिती पुढे आली. (हेही वाचा, Lesbian Friendship: समलैंगिक मैत्रिणीचा लग्नास नकार, व्याकूळ तरुणीचे औरंगाबाद पोलिसांना साकडे)
पोलिसांना दिलेल्या जबाबादरम्यान, पीडितेच्या मैत्रिणीने पोलिसांसमोर कबूल केले की तिचे मृत मुलीशी भावनिक संबंध होते. आपले नाते कुटुंबियांना मान्य होणार नाही हे दोघींनाही कळले आणि त्यामुळे त्या कोलकाता येथे गेल्या आणि शहराच्या उत्तरेकडील भागात असलेल्या दम दम येथील मुलींच्या वसतिगृहात राहू लागल्या, अशी कबुलीही तिने दिली.
ट्विट
A 12th standard student in Malda district of #WestBengal reportedly committed suicide after she was separated from her same-sex partner and batchmate.
The hanging body of the victim girl was recovered on December 1. Her father pointed fingers at her friend and batchmate. pic.twitter.com/K6WBLKuFDQ
— IANS (@ians_india) December 6, 2022
दरम्यान, पीडितेचे वडील तिला वसतिगृहातून परत घेऊन आले. त्यामुळे पीडितेचे आणि तिच्या मैत्रिणीचे सर्व संबंध तुटले. दोघीही शरीराने आणि मनानेही दुर राहू लागल्या. त्यामुळे पीडिता कमालीची नैराश्येत गेली. आपल्या मुलीचे मयत मुलीशी भावनिक संबंध असल्याची कबुलीही तिच्या वडिलांनी दिली.ते म्हणाले, "आम्हाला आश्चर्य वाटते की दोन मुलींचे आपसात भावनिक बंध कसे असू शकतात." दरम्यान, पोलिसांनी मात्र या घटनेवर कोणतेही भाष्य करण्यास नकार दिला आहे.