Mata Vaishno Devi Shrine Route Hit by Landslide and Shooting Stones (Photo Credits: X/@vani_mehrotra)

Landslide Hits Shri Mata Vaishno Devi Route: जम्मू-काश्मीरसह देशातील अनेक राज्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे डोंगरात दरड कोसळण्याच्या (Landslide) घटना वाढल्या आहेत. सोमवारी श्री माता वैष्णो देवी (Shri Mata Vaishno Devi) मार्गावर एका ठिकाणी दरड कोसळली. त्यामुळे काही काळ प्रवास विस्कळीत झाला होता, मात्र जुन्या रुळावरून पुन्हा प्रवास सुरू करण्यात आला. या अपघातात माँ वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी गेलेल्या 3 भाविकांचा मृत्यू झाल्याची बातमी आहे. वैष्णोदेवी मंदिराकडे जाणाऱ्या पंछी मार्गावर हे भूस्खलन झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

मंदिरापर्यंत जाण्यासाठी हा नवा मार्ग बांधण्यात आला होता, मात्र तो खंडित झाल्यानंतर प्रवाशांना येथून पुढे जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. त्याऐवजी सध्या जुन्या ट्रॅकवरून प्रवास सुरू आहे. पंछी हेलिपॅडजवळ भूस्खलन झाले असून, श्री माता वैष्णोदेवी श्राइन बोर्डातर्फे येथे मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे. या अपघातामुळे हेलिकॉप्टर सेवा बंद करण्यात आली.

माता वैष्णोदेवी यात्रा मार्गावर दरड कोसळली-

सध्या ढिगारा हटवण्याचे काम सुरू असले तरी मुसळधार पावसामुळे ढिगारा हटवण्याच्या कामाला आणखी वेळ लागू शकतो. लँड स्लाईड झाल्यानंतर प्रवाशांना वाटेत थांबवण्यात आले असून सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (हेही वाचा: Wall Collapses in Mathura: मथुरा येथे इमारतीची भिंत कोसळल्याने 2 वर्षांच्या मुलीचा मृत्यू, 4 जण जखमी)

दरम्यान, श्री माता वैष्णो देवी मंदिरात देशभरातील आणि जगभरातील भाविक भेट देत असतात. येथे दररोज हजारो भाविकांची गर्दी असते. नवरात्रीच्या काळात हा आकडा लाखांवर पोहोचतो. या दिवसात दरवर्षी 40-50 हजार भाविक माता वैष्णोदेवी मंदिरात पोहोचतात. हिवाळ्यात ही संख्या 10-15 हजारांपर्यंत कमी होते परंतु यापेक्षा कमी भाविकांची संख्या वैष्णोदेवीमध्ये क्वचितच दिसते.