Lakhimpur Kheri Violence: नवजोत सिंह सिद्धू यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात
Navjot Singh Sidhu | (Photo Credits: ANI)

लखीमपुर खीरी हिंसाचार (Lakhimpur Kheri Violence) प्रकरणाचे देशभर पडसत उमटत आहेत. देशभरातील विविध पक्षाचे नेते लाखीमपूर खीरीच्या दिशेने रवाना होत आहेत. उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) सरकारकडून या सर्वच नेत्यांना अडवले जात आहे. काँग्रेस नेते नवजोत सिंह सिद्धू (Navjot Singh Sidhu) हे आज (7 ऑक्टोबर) हजारो वाहनांचा ताफा घेऊन लाखीमपूर खिरीच्या दिशेने निघाले आहेत. दरम्यान, त्याच्या वाहनांचा ताफा यमुना नगर (Yamuna Nagar-Haryana) सहारनपूर (Saharanpur) सीमेवर येथे उत्तर प्रदेश पोलिसांनी अडवला आणि त्यांना ताब्यात घेतले. उत्तर प्रदेश पोलिसांकडून उभारण्यात आलेले अडथळे दूर करुन हा ताफा पुढे जाण्याचा प्रयत्न होता. दरम्यान, पंजाब काँग्रेसचे प्रमुख नवज्योतसिंग सिद्धू यांच्यासह कार्यकर्त्यांना आणि समर्थकांना यमुना नगर (हरियाणा) -सहारनपूर (यूपी) सीमेवर पोलिसांनी ताब्यात घेतले.

सहानपूर येथील मुख्य महामार्गावर नवजोत सिंह सिद्धू यांच्यासह त्यांच्या ताफ्यातील काँग्रेस कार्यकर्त्याच्या हजारो वाहनांची भली मोठी रांग लागली आहे. 3 ऑक्टोबर रोजी लाखीमपूर खीरी येथे मोठ्या प्रमाणावर हिंसाचार झाला होता. या हिंसाचाराच्या घटनेत आठ जणांचा मृत्यू झाला होता. यात चार शेतकऱ्यांचा समावेश आहे. जेव्हा एका काळ्या रंगाच्या SUV वीने आंदोलक शेतकऱ्यांना धडक दिली. त्यांना चीरडत ही SUV घटनास्थळावरुन निघून गेली. तेव्हा ही हिंसा घडली होती.

लाखीमपूर खीरी येथील हिंसाचारात मारल्या गेलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी गेलेल्या काँग्रेस पक्षाच्या महासचिव प्रियंका गांधी वाड्रा यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांना काही काळ अटक करुन ठेवले. यावरही नवजोत सिंह सिद्धूयांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. उत्तर प्रदेश पोलिसांची ही कृती म्हणजे घटनेचे उल्लंघन असल्याचा आरोपही सिद्धू यांनी केला आहे. (हेही वाचा, Lakhimpur Kheri Violence: लखीमपुरच्या घटनेबद्दल सुप्रीम कोर्टाने घेतली स्वत:हून दखल, उद्या होणार सुनावणी)

एएनआय ट्विट

लाखीमपूर प्रकरणी नवजोत सिंह सिद्धू यांनी ट्विट करत बुधवारी म्हटले की, '54 तास होऊन गेले.. प्रियंका गांधी यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले नाही. अत्यंत बेकायदेशीर रित्या त्यांना 24 तासांहून अधिक काळ उत्तर प्रदेश पोलिसांनी ताब्यात ठेवले आहे. हे राज्यघटनेने दिलेल्या अधिकाराचे सरळसरळ उल्लंघन आहे. भाजप आणि उत्तर प्रदेश पोलीस घटनेचे सरळ सरळ उल्लंघन करत आहे.'

एएनआय ट्विट

दरम्यान, नवजोत सिंह सिद्धू यांनी काही दिवसांपूर्वीच पंजाब काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांचा राजीनामा पक्षाने अद्याप स्वीकारला नाही. सिद्धू यांनी मंगळवारी इशारा दिला होता की, शेतकऱ्यांच्या हिंसाचार प्रकरणात केंद्रीय मंत्री अजय मिश्रा आणि त्यांच्या मुलाला अटक नाही झाली तर काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खिरीकडे रवाना होतील.