Lakhimpur Kheri Violence: लखीमपुरच्या घटनेबद्दल सुप्रीम कोर्टाने घेतली स्वत:हून दखल, उद्या होणार सुनावणी
Supreme Court | This Image is Used for Representational Purpose. (Photo Credits: ANI)

Lakhimpur Kheri Violence:  लखीमपुरच्या घटनेप्रकरणी सुप्रीम कोर्टाने स्वत:हून दखल घेतली आहे. यावर आता उद्या सुनावणी मुख्य न्यायाधीशांच्या कोर्टात पार पडणार आहे. लखीमपुर मध्ये 3 ऑक्टोंबरला झालेल्या हिंसाचाराच्या घटनेवरुन सुप्रीम कोर्टाने कार्यवाही करावी अशी वारंवार मागणी केली जात होती. लखमीपुर खीरी मध्ये शेतकऱ्यांकडून आंदोलन केले जात असताना हिंसाचार झाला. यामध्ये 8 जणांना आपला जीव गमवावा लागला.(Lakhimpur Kheri Violence: काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधींसह इतर तीन जणांना लखीमपूर खेरीला जाण्याची यूपी सरकारने दिली परवानगी)

काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी बुधवारी लखमीपुर खीरी हिंसा प्रकरणाचा हवाला देत असे म्हटले की, सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी स्वत: दखल करत पावले उचलली पाहिजेत. या व्यतिरिक्त या घटनेबद्दल सर्वोच्च न्यायालयाला मंगळवारी पत्र लिहित 3 ऑक्टोबरच्या घटनेच्या संदर्भात उच्चस्तरीय न्यायालयीन चौकशीची विनंतीही करण्यात आली.

तर दोन वकिलांनी पत्र लिहित मुख्य न्यायाधीश एन वी रमण यांना विनंती केली की, ते जनहित याचिकेच्या रुपात घेतल्यास दोषींना न्यायालयासमोर हजर करता येईल. यामध्ये गृहमंत्रालय आणि पोलिसांना फआयआर दाखल करण्याचे निर्देशन देणे आणि कथित रुपात सहभागी असलेल्यांना लोकांना शिक्षा देण्याची ही मागणी करण्यात आली आहे.

वकिल शिव कुमार त्रिपाठी आणि सी एस पांडा यांनी लिहिलेल्या पत्रात असे म्हटले की, कोर्टाच्या निगराणीखाली उच्चस्तरीयन न्यायालयीन तपास करण्याची मागणी केली आहे. एक निश्चित काळात यामध्ये सीबीआयला सुद्धा सहभागी करण्यास विनंती केली आहे.(Mumbai: लखीमपूर खेरी हिंसाचाराप्रकरणी काँग्रेसचे मुंबईमध्ये मंत्रालयाजवळील गांधी पुतळ्यासमोर आंदोलन)

दरम्यान, उत्तर प्रदेशमध्ये उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्या कार्यक्रमापूर्वी लखीमपूर खेरीच्या बनबीरपूरमध्ये मोठा गदारोळ माजला. टिकुनियामध्ये उपमुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवण्यासाठी उभे असलेले शेतकरी व भाजप नेत्यांमध्ये झटापट झाली. यामध्ये अनेक शेतकऱ्यांचा मृत्यू झाला.