Lakhimpur Kheri Case: लखीमपूर खीरी प्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांकडून दुसरे आरोपपत्र दाखल, 7 शेतकऱ्यांना ठरवले आरोपी
Lakhimpur Kheri Violence (Photo Credits: ANI)

लखीमपूर खीरी (Lakhimpur Kheri Case) प्रकरणी उत्तर प्रदेश (Uttar Pradesh Police) पोलिसांनी दुसरे आरोपपत्र दाखल केले आहे. या आरोपपत्रात सात शेतकऱ्यांवर एक चालक आणि दोन भाजप नेत्यांच्या हत्येचा आरोप ठेवण्यात आला आहे. पाठीमागील वर्षी 3 ऑक्टोबर या दिवशी घडलेल्या या प्रकरणाबाबत हे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशीष मिश्रा याच्यावर शेतकऱ्यांच्या अंगावर थेट एसयूव्ही घालून चार शेतकऱ्यांचा आणि एका पत्रकाराची हत्या केल्याचा आरोप आहे. यानंतर मोठ्या प्रमाणावर हिंसाचार पाहायला मिळाला होता. यात दोन भाजप कार्यकर्त्यांसह तीघांचा बेदम मारहाण झाल्याने मृत्यू झाला होता. चालक आणि भाजप कार्यकर्त्यांची हत्या झाल्याच्या प्रकरणात पोलिसांनी सात जणांना अटक केली आहे.

लाखीमपूर खीरी प्रकरणात दाखल करण्यात आलेल्या पहिल्या आरोपपत्रात केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या मुलाला आरोपी करण्यात आले आहे. उत्तर प्रदेश पोलीसांनी घटनेच्या दुसऱ्या दिवशी आशीष मिश्रा आणि इतर 12 लोकांवर हत्येच्या आरोपाखाली आरोपी करत एफआयआर दाखल केली होती. मात्र, केंद्रीय मंत्र्याच्या या मुलाला जवळपास आठवडाभरानंतर अटक करण्यात आले. (हेही वाचा, Lakhimpur Kheri Violence: लखीमपूर खेरी येथे घडलेली घटना म्हणजे जालियनवाला बाग हत्याकांडच; Sharad Pawar यांची टीका)

उत्तर प्रदेश पोलिसांच्या विशेष तपास पथकाने या महिन्याच्या सुरुवातीलाच एका स्थानिक कोर्टात 5,000 पानांची पहिले आरोपपत्र दाखल केले होते. या काळात विशेष तपास पथकाने दाखल आरोपपत्राची हजारो पाने लाखीमपूर खीरी मध्ये मुख्य न्यायाधीशांसमोर ठेवली होती. दोन कुलपं लावलेल्या एका मोठ्या पेटीमध्ये ही सर्व पाने होती. केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांचा सध्या तुरुंगात असलेल्या मुला आशीश मिश्रा याच्यावर पाठीमागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात लाखीमपूर खिरी येथील चार शेतकरी आणि एका पत्रकाराची हत्या केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात आठ जणांचा मृत्यू झाला होता.