Delhi-KYC-fraud

आधार आणि केवायसी अपडेटच्या नावाखाली होत असलेली नागरिकांची फसवणूक लक्षात घेऊन दिल्ली पोलिसांनी नागरिकांना सतार्कतेचा इशारा दिला आहे. हा इशारा देतानाच सोशल मीडियाच्या माध्यमातून जनजागृती करत दिल्ली पोलिसांनी जागरुक राहण्याचे अवाहन केले आहे. कोणत्याही लिंकवर क्लिक करण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करा, असे सांगतानाच तसेच लोकांना मोबाईल नंबर आणि वैयक्तिक डेटा कोणासोबतही शेअर करू नका, अशी विनंतीही त्यांनी केली आहे. दिल्ली पोलिसांनी असेही म्हटले आहे की बँका कधीही त्यांच्या ग्राहकांना केवायसी अपडेट लिंक पाठवत नाहीत.

ट्विट